ind vs sl ishaan kishan took an impossible catch charith asalanka gone watch video rishabh pant sakal
क्रीडा

IND vs SL: ऋषभच्या अनुपस्थितीत इशान किशनची जीव तोडून विकेटकिपिंग

Kiran Mahanavar

Ishaan Kishan Took Impossible Catch IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने दोन धावांनी जिंकला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 160 धावा करू शकला आणि सामना दोन धावांनी गमावला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने श्रीलंकेचा फलंदाज चारिथचा जबरदस्त झेल टिपला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेच्या डावाच्या 8व्या षटकात डावखुरा फलंदाज असलंकाने वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या चेंडूवर हवेत शॉट खेळला. चेंडू बॅटच्या मध्यभागी लागला नाही आणि विकेटच्या मागे गेला. इशान किशनने बिबट्याच्या वेगाने धावत अप्रतिम झेल घेत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा झेल पाहून चाहते खूप कमेंट करत आहेत. ऋषभच्या अनुपस्थितीत इशान किशनची जीव तोडून विकेटकिपिंग करत आहे. दरम्यान, भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही इशान किशनच्या या झेलचे कौतुक केले आहे आणि हा अलीकडच्या काळातील सर्वोत्तम झेल असल्याचे म्हटले आहे. पठाणने ट्विटरवर लिहिले, “अलिकडच्या काळात यष्टिरक्षकाने घेतलेला सर्वोत्तम झेल. ईशान किशनने अप्रतिम काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाने आंध्र प्रदेशचे माजी नागरी पुरवठा मंत्री आणि माजी आमदार कारुमूरी वेंकट नागेश्वर राव यांना अटक केली

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT