axar patel sakal
क्रीडा

IND vs SL: अक्षर पटेलने 'या' खेळाडूची कारकीर्द सुरु होण्याआधी संपवले?

हा खेळाडू अलीकडेच संपूर्ण टी-20 मालिकेसाठी बेंचवर बसलेला दिसला आणि आता...

Kiran Mahanavar

IND vs SL ODI Match : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. हे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकून मालिकेवर कब्जा केला आहे. मात्र या मालिकेत संघातील एका खेळाडूचे नशीब अजिबात बदललेले नाही.

हा खेळाडू अलीकडेच संपूर्ण टी-20 मालिकेसाठी बेंचवर बसलेला दिसला होता आणि अजूनही तो वनडे मालिकेत पहिल्या संधीची वाट पाहत आहे. धाकड अष्टपैलू अक्षर पटेलच्या शानदार खेळामुळे हा खेळाडू प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत फिरकी अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल संघाची पहिली पसंती कायम आहे. अक्षर पटेलही संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला या मालिकेत आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संघाचा भाग होते, मात्र अक्षर पटेलच्या खेळामुळे वॉशिंग्टन सुंदरला या वनडे मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पाहिले अक्षर पटेलने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात 1 विकेट आणि 30 धावा केल्या आहेत, तर टी-20 मालिकेत त्याने 117 धावा आणि 3 विकेट घेतल्या आहेत.

वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 4 कसोटी सामन्यात 265 धावा आणि 6 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 12 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामनेही खेळले गेले आहेत. या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 212 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी टी-20 सामन्यांमध्ये सुंदरने खालच्या क्रमाने फलंदाजी करताना 47 धावा आणि गोलंदाजीत 26 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा एकदिवसीय संघ श्रीलंकेविरुद्ध:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT