Shikhar Dhawan IND vs SL sakal
क्रीडा

Shikhar Dhawan : बीसीसीआयने गब्बरचा वापर केला अन् दिले फेकून

शिखर धवनची कारकीर्द संपली? एकदिवसीय संघातून पत्ता कटा

Kiran Mahanavar

Shikhar Dhawan IND vs SL : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. ही देशांतर्गत मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिला टी-20 सामना मुंबईत खेळल्या जाणार आहे. यावेळी बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेत काही स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. टी-20 मालिकेतून वरिष्ठांना विश्रांती देण्यात आली आहे, तर शिखर धवन आणि ऋषभ पंत या खेळाडूंना वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. धवनच्या वगळण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण गेल्या काही मालिकांमध्ये तो टीम इंडियाचा कर्णधारही होता.

शिखर धवनची कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये निवड होत नाहीये. जर तो चांगला खेळला तर तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच राहील आणि पुढील वर्षी 2023 होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवू शकेल, असे स्पष्ट संकेत त्याच्यासाठी होते. पण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून धवनला वगळणे म्हणजे त्याच्या कारकिर्दीला कुठेतरी पूर्णविराम देण्यासारखे आहे. शिखर धवनच्या खराब कामगिरीमुळे त्याला वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. शेवटचा बांगलादेश दौरा धवनसाठी चांगला गेला नाही. अशा परिस्थितीत त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

शिखर धवनने गेल्या 5 वनडेत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. या सर्व सामन्यात त्याने एकूण 49 धावा केल्या आहेत. म्हणजेच पाचही सामन्यांचा स्कोअर बघितला तरी फिफ्टीही होत नाहीये. बांगलादेशसारख्या कमकुवत संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये धवनला एकदाही दुहेरी आकडा स्पर्श करता आला नाही. 37 वर्षीय धवनची हकालपट्टी करण्याचे आणखी एक कारण त्याचे वाढलेले वय असू शकते. हे शक्य आहे की बीसीसीआय आपल्या योजनेत फक्त तरुण खेळाडूंचा विचार करत आहे. पण कारण काहीही असले तरी धवनने कामगिरी केली नाही तर वनडे विश्वचषकातून त्याची वगळणे निश्चित मानले जाऊ शकते हे स्पष्टपणे दिसत आहे.

भारतीय टी-20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

भारतीय एकदिवसीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT