ind vs sl umran malik  sakal
क्रीडा

Umran Malik: स्पीड गनची जादू; असा क्लीन बोल्ड केला की स्टंपने हवेत घेतली सहा वेळा गुलाटी - Video

एकीकडे सूर्याच तुफान दुसरीकडे उमरान मलिकनेही खतरनाक गोलंदाजीने केले थक्क....

Kiran Mahanavar

Umran Malik Video IND vs SL : राजकोटमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात एकीकडे सूर्यकुमार यादवची तुफान खेळी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे वेगवान उमरान मलिकनेही आपल्या खतरनाक गोलंदाजीने थक्क केले.

उमरान मलिकने तिसऱ्या टी-20 सामन्यात 3 षटकात 31 धावा देत 2 विकेट घेतल्या. उमरानने वानिंदू हसरंगा याला 9 धावांवर आणि महीश थीक्षानाला 2 धावांवर बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. उमरानने आपल्या तुफानी चेंडूवर थीक्षानाला अशा प्रकारे गोलंदाजी केली की क्रिकेटप्रेमी थक्क झाले.

लंकेच्या डावाच्या 16व्या षटकात हे दृश्य दिसले. श्रीलंकेच्या 7 विकेट 123 धावांत पडल्या होत्या. अशा स्थितीत उमरानने या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संघर्ष करणाऱ्या श्रीलंकेला मोठा धक्का दिला. उमरानचाचेंडू इतका धोकादायक होता की, महीश थीक्षानाला तो कळला नाही आणि क्लीन बोल्ड झाला. उमरानच्या या प्राणघातक चेंडूने स्टंपने हवेत सहा वेळा गुलाटी घेतली.

उमरान मलिकने या मालिकेतील तीन सामन्यात 7 विकेट घेत जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंगही खूप प्रभावी ठरला. त्याने 2.4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. कर्णधार हार्दिक पांड्याने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. त्याचबरोबर युझवेंद्र चहलने 3 षटकांत 30 धावा देत 2 बळी घेतले.

भारतीय संघाच्या 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारताने हा सामना 91 धावांनी जिंकला. टीम इंडिया आता 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेची तयारी सुरू करणार आहे. जिथे रोहित शर्मा कर्णधार असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : व्हिडिओ माझाच पण त्यातील आवाज माझा नाही, लक्ष्मण हाके

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT