IND vs SL virat kohli century gautam gambhir who prais suryakumar yadav got trolled check Memes Viral  
क्रीडा

IND vs SL : विराटने शतक करताच X फॅक्टर सूर्या म्हणणारा गंभीर झाला ट्रोल; भन्नाट Memes Viral

सकाळ डिजिटल टीम

gautam gambhir memes : भारताचा आघाडीचा फलंदाड विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा (83 धावा) आणि शुभमन गिलने (70 धावा) 143 धावांची सलामी दिली. यासामन्यात विराट कोहलीने आपले 73 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले.मात्र विराटच्या शतकानंतर कमेंट्री बॉक्समध्ये बसलेला गौतम गंभीर प्रचंड ट्रोल होत आहे.

याचबरोबर विराट कोहलीने आपल्या वनडेमधील 12500 धावा देखील पूर्ण केल्या. या धावा पूर्ण करताना विराट कोहलीने इतिहास रचला. यानंतर सोशल मीडियावर विराट कोहली ट्रेंड करत आहे. गंभीरच्या मॅच कंमेट्रीबद्दलच्या मीम्सचा पाऊस पडला. लोक गंभीरची चांगलीच फिरकी घेताना दिसत आहेत.

अतुल प्रकाश या ट्विटर यूजरने मिमिक्रीचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. याला गंभीर कोहलीला प्रत्येकवेळी टारगेट करताना कशी कमेंट्री करतो याची मिमिक्री केली आहे.

क्रिकेट चाहते अनेक भन्नाट मीम्स शेअर करत आहेत. यामध्ये सूर्या आणि विराटच्या खेळाची तुलना केली जात आहे. तसेच गंभीर कसा प्रत्येक वेळी विराटला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो यावर देखील खोचक टीका करण्यात आली आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहली हा वनडे इतिहासात डावांच्या बाबतीत सर्वात वेगवान 12500 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.

विराटने सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले. विराट कोहलीने 257 डावात वनडेतील 12500 धावा पूर्ण केल्या. यानंतर विराटवर सतत टीका करणाऱ्या गंभीर ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT