Jasprit Bumrah on Kuldeep Yadav  Sakal
क्रीडा

बुमराह म्हणतो; संघातून बाहेर पडणं कुलदीपच्या फायद्याचं

सकाळ डिजिटल टीम

India vs Sri Lanka, Pink Ball Test - भारत आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी पिंक बॉल टेस्ट खेळवली जाणार आहे. बंगळुरुच्या मैदानात होणारा सामना जिंकून टीम इंडिया (Team India) दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्विप देण्याच्या इरद्याने मैदानात उतरेल. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा उप कर्णधार जसप्रित बुमराह (JaspritBumrah) याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

बंगळुरुच्या मैदानात रंगणाऱ्या डे-नाइट टेस्टसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? असा प्रश्न बुमराहला विचारण्यात आला होता. यावर बुमराह म्हणाला की, आम्ही खूप दिवसानंतर पिंक बॉल टेस्टसाठी मैदानात उतरणार आहोत. प्लेइंग इलेव्हनसंदर्भात टीम मिटींगमध्ये चर्चा झाली आहे. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कोणाला खेळवायचे याचा निर्णय घेण्यात येईल.

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल झालाय फिरकीपटू कुलदीप यादवच्या (KuldeepYadav ) जागा अक्षर पटेलची संघात वर्णी लागलीये. कुलदीपला बाहेर बसवण्याच्या निर्णयासंदर्भात बुमराहने मोठे वक्तव्य केले. कुलदीपला टीम इंडियातून ड्रॉप करण त्याच्या फायद्याच आहे. असे तो म्हणाला. बऱ्याच काळापासून तो बायोबबलमध्ये आहे. आता त्याला आयपीएल आधी कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल, असा उल्लेखही बुमराहने केला.

अक्षर पटेलच्या कमबॅकने टीम इंडियाची ताकद आणखी वाढेल. संघाला त्याचा फायदा होईल, असे सांगत अक्षर पटेलचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के असल्याचे संकतही त्याने दिली. याशिवाय रविंद्र जाडेजाला विश्रांती मिळणार नसल्याचे सांगून तोही प्लेइंग इलेव्हनचा भाग असल्याचे बुमराहने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

Latest Marathi News Live Update : मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

SCROLL FOR NEXT