shikhar dhawan sakal
क्रीडा

Ind vs WI: मालिका जिंकल्यानंतर धवन म्हणाला... 'हे' टीम इंडियाचे खरे हिरो

टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिका कब्जा केला. कर्णधार शिखर धवनने या विजयानंतर खेळाडूंचे जोरदार कौतुक केले.

Kiran Mahanavar

India vs West Indies 2nd Odi: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला. टीम इंडियाने या रोमांचक सामन्यात 2 चेंडू आणि 2 विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. अष्टपैलू अक्षर पटेल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. मालिका जिंकल्यानंतर कर्णधार शिखर धवन खूप आनंदी दिसला. धवनने युवा खेळाडूंचे मन भरून कौतुक केले.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली आहे. संघाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात विजयानंतर शिखर धवनने युवा टीम इंडियाचे जोरदार कौतुक केले. धवन म्हणाला, संघाने केलेली ही उत्कृष्ट कामगिरी होती. खेळाडूंनी त्यांचा आत्मविश्वास गमावला नाही हे आश्चर्यकारक होते. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल या सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आवेश खानने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात 10 महत्त्वपूर्ण धावा केल्या. डावाची सुरुवात आम्ही थोडी संथ केली. या सामन्यात अय्यर-सॅमसनच्या भागीदारीमुळे मोठा फरक पडला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपने कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने 74 धावांची खेळी खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी घेतले. आवेशचा हा डेब्यू वनडे होता आणि तो चांगलाच महागात पडला. त्याने 6 षटकात 54 धावा दिल्या.

भारतासमोर 312 धावांचे लक्ष्य होते, टीम इंडियाने 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 63 धावा, संजू सॅमसन 54 धावा आणि अक्षर पटेल 64* धावा केल्या. अक्षर पटेलला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT