Yuzvendra Chahal Ravindra Jadeja wi vs ind 2nd odi 
क्रीडा

WI vs IND : ड्रेसिंग रूममध्ये चहलने रागात जडेजाला दाखवले डोळे! त्याने गाल ओढले अन्... Video

Kiran Mahanavar

Yuzvendra Chahal Angry look Ravindra Jadeja WI vs IND ODI : युजवेंद्र चहलची सध्या मर्यादित षटकांमध्ये सर्वोत्तम लेगस्पिनर्समध्ये गणना केली जाते. मात्र चहलला टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये सतत बाहेर आहे, कारण टीममध्ये चायनामन कुलदीप यादव देखील आहे. मैदानात असो की बाहेर चहल सतत चर्चेत असतो. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही, पण हा लेगस्पिनर पुन्हा चर्चेत आला.

युजवेंद्र चहल त्याच्या मस्त शैलीसाठी ओळखला जातो. संघातील खेळाडूंसोबत तो खूप धमाल करत असतो. मात्र, दुसऱ्या वनडेत चहलचे वेगळेच एक्सप्रेशन पाहायला मिळाले. चहल हा त्याचा सहकारी खेळाडू रवींद्र जडेजाकडे बघत त्याला रागाने काहीतरी म्हणत होता.

दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. संघाचे फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. रवींद्र जडेजा बॅटिंग करायला निघाला होता आणि पॅड घालून बॅटिंगला जाण्यासाठी तयार होता तो ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांजवळ उभा होता. त्यावेळी चहल खालून वर येत होता. त्यानंतर जडेजा आणि चहल यांच्यात काहीतरी झाल. जडेजा हसत होता आणि चहल त्याच्याकडे रागाने पाहत त्याच्याकडे गेला आणि त्याला काहीतरी म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून जडेजा हसायला लागला आणि त्याने गमतीने त्याचे गाल पकडले.

वेस्ट इंडिजमध्ये सहा वर्षांनंतर भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने त्याचा सहा विकेट्सने पराभव केला. शनिवारी विजयानंतर विंडीजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादमध्ये 1 ऑगस्टला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT