Ishan Kishan Virat Kohli Rohit Sharma  
क्रीडा

Wi vs Ind Test: रोहित शर्माचा निर्णय नव्हता तर... कोणाच्या सल्ल्याने इशान नंबर-4 वर फलंदाजीला आला?

Kiran Mahanavar

How Virat Kohli Sacrifice His batting position For Ishan Kishan : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी त्रिनिदाद येथे खेळली जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजीच्या क्रमात काही बदल पाहायला मिळाले.

चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी दुसरी कसोटी खेळणारा इशान किशन फलंदाजी करताना दिसला. चौथ्या क्रमांकावर खेळताना इशानने वेगवान खेळी खेळली. पण तुम्हाला माहिती आहे का की इशान किशनला नंबर-4 वर पाठवण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय नव्हता. होय, चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर खुद्द इशाननेच याचा खुलासा केला आहे.

दुसऱ्या डावात भारताकडून बरीच आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अवघ्या 71 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनने 34 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52* धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 152.94 होता.

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इशान किशन म्हणाला की, “हे खूप खास होते. संघाला माझ्याकडून काय हवे आहे हे मला माहीत होते. सर्वांनी मला पाठिंबा दिला. विराटने मला त्यांच्या जागी खेळण्यास सांगितले. आशा आहे की उद्या आम्ही खेळ पूर्ण करू. विराट भाईंनीच पुढाकार घेऊन मी जावे असे सांगितले.

इशान पुढे म्हणाला, “डाव्या हाताने स्लो बॉलर गोलंदाजी करत होता. संघाकडून तो चांगला कॉल होता. कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. आमची योजना अशी होती की पावसाच्या विश्रांतीनंतर आम्ही 10-12 षटके खेळू आणि 70-80 धावा करू."

भारतीय संघाने दुसऱ्या डावात वेगवान फलंदाजी करताना 2 बाद 181 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला 365 धावांचे लक्ष्य मिळाले. धावांचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाने चौथ्या दिवसअखेर 2 गडी गमावून 76 धावा केल्या आहेत. आता वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला विजयासाठी 8 विकेट्सची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT