Team India sakal
क्रीडा

IND vs WI : टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर 'या' खेळाडूची उणीव भासणार, निवडकर्त्यांनी संपवली कारकीर्द!

Kiran Mahanavar

Ind vs Wi Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताला 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यावर टीम इंडियाला आपल्या एका खेळाडूची नक्की उणीव भासेल. टीम इंडियाच्या या खेळाडूची कारकीर्द निवडकर्त्यांनी जवळपास संपवली आहे.

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची वनडे आणि टी-20 कारकीर्द कसोटीनंतर संपली असून आता या क्रिकेटपटूकडे निवृत्तीचाच पर्याय उरला आहे. भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. याशिवाय भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भुवनेश्वर कुमार 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता, पण त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली होती. कारण यानंतर भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार हा टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होता. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करून विकेट घेत होता आणि गरज पडली तर फलंदाजीने चांगली कामगिरी करून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढायचा.

मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट या घातक वेगवान गोलंदाजांनी आता भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. या गोलंदाजांमुळे भुवनेश्वर कुमारचे भारताच्या वनडे आणि कसोटी संघात पुनरागमन करणे आता अशक्य आहे.

भुवनेश्वर कुमार गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक 2022 आणि आशिया कप 2022 मध्ये भारताच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरला. यादरम्यान भुवनेश्वर कुमारनेही जोरदार धावा लुटल्या होत्या. त्यामुळेच आता निवडकर्त्यांनी त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT