India vs West Indies 2nd Test sakal
क्रीडा

Wi vs Ind 2nd Test: 12 विकेट्ससह पहिली कसोटी एकहाती जिंकावली तरी अश्विन होणार टीममधून बाहेर?

Kiran Mahanavar

Wi vs Ind 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जाणार आहे. यासाठी टीम इंडिया त्रिनिदादला पोहोचली असून वेस्ट इंडिजनेही आपला संघ जाहीर केला आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियातून दुसऱ्या कसोटीसाठी वगळण्याची टांगती तलवारही अश्विनवर आहे. हाेय पहिल्या सामन्याचा हिरो कदाचित दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. पोर्ट ऑफ स्पेनच्या परिस्थितीत टीम इंडियाच्या नवीन गेम प्लॅनमुळे ही शक्यता दिसत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे. भारताने डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटी अवघ्या 3 दिवसात एक डाव आणि 141 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. अश्विन 12 विकेट घेत त्या कसोटीचा हिरो ठरला होता. पहिल्या डावात त्याने 5 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. पण या दरम्यान ऑफ स्पेनमधून बातम्या येत आहेत की अश्विनला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये स्थान नाही.

अश्विनला वगळण्याचा धोका का?

आता प्रश्न असा आहे की, अश्विनला वगळण्याचा धोका का आहे? त्यामुळे पोर्ट ऑफ स्पेनच्या खेळपट्टीवर तो खेळणार नाही. खंर तर डॉमिनिकामधील पराभवानंतर वेस्ट इंडिजचा संघ विजयासाठी आतुर झाला आहे. त्यांना कोणत्याही किंमतीत मालिकेत परतायचे आहे. वेस्ट इंडिज हा सामना गमावू इच्छित नाही आणि त्यासाठी काहीही करू शकतात.

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये चमकले वेगवान गोलंदाज

वेस्ट इंडिज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळपट्टी वेगवान गोलंदाजासाठी तयार करू शकते. वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्या ही आधीच पोर्ट ऑफ स्पेनची खासियत आहे. येथे स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करतात. 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये फक्त एका फिरकी गोलंदाजाचा समावेश आहे, म्हणजे उर्वरित 4 वेगवान गोलंदाज आहेत.

ब्रेथवेट अँड कंपनी आता पोर्ट ऑफ स्पेनच्या या ताकदीला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ढाल बनवू शकते. त्यामुळे भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. डॉमिनिकामधील विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही संघात बदल करण्याबाबत बोलला होता. मग जर वेस्ट इंडिजने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेगवान खेळपट्टी तयार केली, तर अश्विनला दुसऱ्या कसोटीतून बाहेर जाईल. अश्विनच्या जागी भारतीय संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजाचा समावेश करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT