Ishan Kishan and Ruturaj Gaikwad to open for Team India  Sakal
क्रीडा

रोहितचा मोठेपणा! स्वत: माघार घेत युवा पोरांना दिली संधी

सुशांत जाधव

India vs West Indies, 3rd T20I : वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. पोलार्डने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि रिषभ पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अखेर ऋतूराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळाली. प्लेइंग इलेव्हनसमोर आल्यानंतर रोहित इशानसोबत (Ishan Kishan) डावाला सुरुवात करणार की ऋतूराजसोबत असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्की पडला असेल. पण वेगळाच प्रयोग या सामन्यात पाहायला मिळाला.

रोहित शर्माने युवा खेळाडूंवर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी दिली. इशान किशन आणि ऋतूराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली. याआधी इशान किशन आणि रोहित शर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलमध्ये विक्रमी बोली लागलेल्या इशानला आपल्यातील धमक दाखवण्यात अपयश आले आहे. त्याला या सामन्यात दमदार कामगिरी करुन दाखवावी लागेल.

दुसरीकडे ऋतूराज गायवाड पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसला होता. त्याला तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात संधी मिळाली. पण तो अवघ्या चार धावा करुन तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठीही नवा प्रयोग पाहायला मिळाला. श्रेयस अय्यरने त्याची जागा घेतली. या युवा खेळाडूंशिवाय आयपीएलमधील कामगिरीनं विशेष लक्ष वेधणाऱ्या आवेश खानलाही टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे. गोलंदाजीमध्ये तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वेस्ट इंडीज संघाला वनडे सामन्यात 3-0 असे पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने टी-20 मालिकाही जिंकली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने ही मालिका आधीच खिशात घातली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात विजय नोंदवून रोहितच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा व्हाईट बॉलवर प्रतिस्पर्ध्याला व्हाईट वॉश करण्याची संघाला संधी आहे. रोहित पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला होता. वनडेत कॅरेबियन संघाचा त्यांनी दारुण पराभव केला. आता हीच पुनरावृत्ती टी-20 मालिकेत करण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानात उतरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT