Rohit Sharma and Ishan Kishan
Rohit Sharma and Ishan Kishan Sakal
क्रीडा

रेकॉर्ड ब्रेक 1000 वी वनडे! टीम इंडियाचा 519 वा विजय

सुशांत जाधव

India vs West Indies, 1st ODI : युजी आणि वॉशिंग्टनच्या खेळीनंतर रोहित शर्माच्या सुंदर खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला पराभूत केले. भारतीय संघाने 1000 व्या वनडे सामन्यात 519 विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. युजी आणि वॉशिंग्टनच्या फिरकीसमोर वेस्ट इंडीजच्या संघाने गुडघे टेकले. जेसन होल्डरच्या अर्धशतकाच्या जोरावर कॅरेबियन संघाने कशा बशा 176 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने युवा सलामीवीर ईशान किशनच्या साथीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली.

भारतीय सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्मा 60 धावा करुन बाद झाला. त्याच्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहली चार चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 8 धावा करुन बाद झाला. या दोघांनाही अल्झारी जोसेफनं तंबूचा रस्ता दाखवला. हसैन याने ईशान किशनच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. त्याने 36 चेंडूत 28 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 2 चौकार आणि एक षटकार खेचला. जोसेफन पंतला रन आउट केले. त्याने 11 धावांची भर घातली. सुर्यकुमार यादव 34 (36) आणि दीपक हुड्डा 26(32) धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय संघाने यासामन्यासह 1000 वनडे सामने खेळण्याचा विक्रम रचला. आतापर्यंतचा भारताचा हा 519 वा विजय ठरला. 431 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असून 41 सामन्यांचा अनिर्णित राहिले आहेत. 2002 मध्ये भारतीय संघाने 500 वा वनडे सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ तीन संघांनी 900 हून अधिक वनडे सामने खेळले आहेत. यात भारत 1000, ऑस्ट्रेलिया 958 आणि पाकिस्तान 936 सामन्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

Latest Marathi News Live Update: ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के..

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

SCROLL FOR NEXT