Rohit Sharma showing MSD kind of judgment in DRS  Sakal
क्रीडा

'डेफिनेट्ली रोहित सिस्टिम'; DRS वरुन हिटमॅनची धोनीशी तुलना

सुशांत जाधव

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजची अवस्था बिकट केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना 239 धावांचे लक्ष्य दिल्यानंतर भारतीय गोलंदाजानी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. प्रसिद्ध कृष्णानं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने Brandon King रुपात वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या डॅरेन ब्रावोला त्याने जास्त काळ मैदानात थांबू दिले नाही. प्रसिद्ध कृष्णाने त्याला प्रसिद्ध कृष्णा करवी झेलबाद केले.

भारतीय संघाला (Team India) मिळालेल्या दुसऱ्या विकेटमध्ये कर्णधार रोहित शर्माने (Rohit Shrama) DRS चा वापर केला. यशस्वी रिव्ह्यूनंतर सोशल मीडियावर रोहित शर्माची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. DRS घ्यावा की नाही यासंदर्भात रोहित शर्माची विचार करण्याची पद्धती माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी (MS Dhoni) मिळती जुळती आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारापैकी एक असलेल्या धोनीला रिव्ह्यू सिस्टिम म्हणून ओळखले जायचे. त्याने घेतला रिव्ह्या सहजासजी वाया जायचा नाही. आता तोच वारसा पुढे रोहित शर्मा चालवेल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसते. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेतून रोहित शर्माने वनडेत पूर्णवेळ कर्णधाराची जबाबदारी स्विकारली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी टीम

प्रसिद्ध कृष्णाच्या षटकाने शॉर्ट पिच टाकलेला चेंडू ब्रावोच्या बॅटची कड घेऊन रिषभ पंतच्या हाती विसावला. पण पंच नितीन मेनन यांनी त्याला नाबाद ठरवले. पंत आत्मविश्वासाने बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याचे ओरडून सांगताना दिसला. रोहित शर्माने अधिक वेळ न घेता रिव्ह्यू घेतला आणि त्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला. ब्रावोला तंबूचा रस्ता धरावा लागला. या मालिकेत रोहित शर्माने याआधी तीन रिव्ह्यू घेतले होते. ते तिन्ही DRS यशस्वी ठरले. यात आता आणखी एका यशस्वी रिव्ह्यूची भर पडली आहे. याआधी रोहित शर्माच्या DRS निर्णयावरुन लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आता DRS चे नाव डेफिनेटली रोहित शर्मा सिस्टीम ठेवायला असायला हवे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT