Wi VS Ind Test Series 
क्रीडा

Wi VS Ind Test Series : पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहितचा मोठा निर्णय! धोनीच्या लाडक्या खेळाडूला देणार डच्चू

Kiran Mahanavar

Ind vs Wi Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ एका महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय संघाने याआधी 11 जूनपर्यंत इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला होता. यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ज्याचा पहिला सामना 12 जुलैपासून सुरू होणार आहे.

भारतीय संघाला बऱ्याच कालावधीनंतर एवढा मोठा ब्रेक मिळाला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर प्रश्न नक्कीच असेल की ते पहिल्या सामन्यात कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरतील. रोहित शर्मा अशा युवा खेळाडूला बाहेर ठेवू शकतो, ज्याने गेल्या सीझनच्या आयपीएलमध्ये मोठी खेळी केली होती.

टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण संघाची घोषणा बीसीसीआयने आधीच केली आहे. यावेळी भारतीय संघ खूपच बदललेला दिसेल.

चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूंना स्थान मिळालेले नाही, तर युवा यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळाले आहे. टीम इंडिया ज्या प्रकारे खेळ पाहत आहे, ते पाहता यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे दोघेही पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतील.

रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल सलामीवीर ?

कर्णधार रोहित शर्मासह सलामीची जबाबदारी यशस्वी जैस्वालकडे दिली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच शुभमन गिल संघात कायम राहणार असला तरी त्याला तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. याआधी तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा खेळायचा. अशा स्थितीत शुभमन गिल नव्या जबाबदारीसाठी तयार होऊ शकतो. यानंतर विराट कोहलीचे चौथ्या क्रमांकावरचे स्थान निश्चित झाले आहे.

त्याचबरोबर पाच आणि सहाव्या क्रमांकावर असलेल्या अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि इशान किशन यांना संघात घेतले जाईल, मग रवींद्र जडेजा येणार म्हणजेच संपूर्ण संघच तगडा आहे. अशा स्थितीत ऋतुराज गायकवाडला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. रोहित शर्मा अंतिम निर्णय काय घेतो हे पाहावे लागेल.

ऋतुराज गायकवाड करावी लागेल प्रतीक्षा

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे. गेल्या अनेक मोसमांपासून शानदार फलंदाजी करत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने त्याला बक्षीस म्हणून कसोटी संघात स्थान दिले आहे.

अडचण अशी आहे की या मालिकेत फक्त दोनच सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात जैस्वालला संधी मिळाली आणि फलंदाजीत स्थिरावला तर ऋतुराज गायकवाडला दुसऱ्या कसोटीतही स्थान मिळवणे कठीण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT