Ind vs Wi Virat Kohli 
क्रीडा

Ind vs Wi Virat Kohli : तोच चेंडू, तीच चूक! सराव सामन्यातही कोहली खाली मुंडी घालून..., Video व्हायरल

Kiran Mahanavar

Ind vs Wi Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सराव सामन्यासह तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाचा सराव सामना बुधवारी सुरू झाला. या सामन्यात 8 भारतीय खेळाडूंशिवाय वेस्ट इंडिजचे 3 प्रथम श्रेणीचे खेळाडूही खेळत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कॅरेबियन बेटांमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. पण त्याआधी टीम इंडिया आपापसात सामने खेळून सराव करत आहे. या सामन्यात विराट कोहलीची बॅट शांत राहिली. कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू मारताना दिसला आणि तो आऊट झाला. या सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही.

डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने राऊंड द विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला लेन्थ बॉल टाकला. विराटने या चेंडूचा पाठलाग केला. चेंडूने बॅटची बाहेरची कड घेतली आणि स्लिप क्षेत्ररक्षकाने सोपा झेल घेतला.

गेल्या काही काळापासून विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने 23 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 31.76 च्या सरासरीने 1239 धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतके आणि केवळ एक शतक आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याने हे शतक झळकावले.

कोहली मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याच्या जुन्या फॉर्म परत आला आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये किंग कोहली काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या हंगामाची धमाकेदार सुरुवात करण्याचा विराट प्रयत्न असेल.

टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे 2023 (भारतीय वेळ) पूर्ण वेळापत्रक :

  • 12 जुलै - 16 जुलै: पहिली कसोटी, डॉमिनिका (7:30 PM)

  • 20 जुलै-24 जुलै: दुसरी कसोटी, त्रिनिदाद (PM 7:30)

  • 27 जुलै: पहिला एकदिवसीय, बार्बाडोस (PM 7:00)

  • 29 जुलै: दुसरा एकदिवसीय, बार्बाडोस (PM 7:00)

  • 1 ऑगस्ट: तिसरा एकदिवसीय, त्रिनिदाद (PM 7:00)

  • 3 ऑगस्ट: पहिला T20I,त्रिनिदाद (PM 8:00)

  • 6 ऑगस्ट: दुसरा T20I, गयाना (PM 8:00)

  • 8 ऑगस्ट: तिसरा T20I, गयाना (PM 8:00)

  • 12 ऑगस्ट: चौथा T20I, फ्लोरिडा (PM 8:00)

  • 13 ऑगस्ट: पाचवा T20I, फ्लोरिडा (PM 8:00)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT