Sarfaraz Khan vs BCCI sakal
क्रीडा

IND vs WI : '...निवडकर्ते मूर्ख आहेत का?' सरफराज खानला टीम इंडियातून डावलल्यानंतर BCCIचं स्पष्टीकरण

Kiran Mahanavar

India tour of West Indies 2023 : शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर झाला तेव्हा त्यात सरफराज खानचे नाव नव्हते. यानंतर सुनील गावसकर यांच्यासह अनेक माजी दिग्गजांनी भारतीय निवड समितीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते, पण आता सत्य समोर आले आहे.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सरफराज खानची फिटनेस संघाला आवश्यक असलेल्या पातळीपर्यंत नाही. तसेच मैदानाबाहेर त्याचे वर्तन देखील खराब होते आणि या दोन्ही गोष्टी त्याच्या नावाचा विचार न करण्यामागील प्रमुख कारणे आहेत.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्या निवड न झाल्यामुळे ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या योग्य आहेत, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्या निवड न होण्यामागे काही कारण आहे. त्यात मैदानाबाहेरील काही कृतींचाही समावेश आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अशा फलंदाजाकडे दुर्लक्ष करण्यात निवडकर्ते मूर्ख आहेत का? त्याचा फिटनेस आंतरराष्ट्रीय दर्जाचा नसल्याचंही एक मोठे कारण आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्याच्या फिटनेसशिवाय मैदानाबाहेर त्याचे वर्तन कुठेही योग्य नाही. अशा काही घटना घडल्या आहेत ज्या त्याच्या बाजूने अजिबात नव्हत्या. आम्हाला आशा आहे की त्याचे वडील आणि त्याचे प्रशिक्षक नौशाद खान यावर नक्कीच काम करतील.

निवडीत आयपीएलमधील कामगिरीचाही विचार केला जातो का, असा प्रश्न बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विचारला असता, त्याने सांगितले की, कसोटी संघाची निवड देशांतर्गत स्तरावर केलेल्या कामगिरीच्या आधारे केली जाते. आम्ही यापूर्वी मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारीसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे ज्यांनी चांगली कामगिरी केली. येथे आयपीएलमधील कामगिरीचा कसोटीतील निवडीसाठी विचार केला जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा कहर; रस्त्यांवर पाणी, वाहतूक कोंडी

Kolhapur Newborn Death : पुराच्या पाण्याचा अडथळा, वाटेतच महिलेची प्रसुती; नवजात बालकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT