Mithali Raj ICC Twitter
क्रीडा

वर्ल्ड रेकॉर्डसह महिला क्रिकेटमध्ये मितालीचं 'राज्य'

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत तिने हा विक्रम प्रस्थापित केला.

सुशांत जाधव

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. इंग्लंड विरद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात तीने 22 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात 22 वर्षांचा पल्ला गाठणारी ती दुसरी खेळाडू ठरली. (IND W vs ENG W Mithali Raj Set World Record The Highest International Run Scorer Women Cricketer)

त्यानंतर आता आपल्या 22 वर्षांच्या प्रदिर्घ कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही तिच्या नावे झालाय. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटरमध्ये मिताली अव्वलस्थानी पोहचली आहे. तिने इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्सचा विक्रम मागे टाकला. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत तिने हा विक्रम प्रस्थापित केला.

मिताली राजने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत 11 कसोटी सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकासह 669 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये तिच्या नावे 89 सामन्यात 2 हजार 364 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातून काही दिवसांपूर्वीच तिने निवृत्ती घेतली होती. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेपूर्वी मितालीने 216 वनडेत 7229 धावा केल्या होत्या. यात 7 शतक आणि 57 अर्धशतकांचा समावेश होता. तिन्ही प्रकारात तिच्या नावे 10,262 धावांची नोंद होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 12 धावा करताच मितालीच्या नावे सर्व प्रकारात मिळून सर्वाधिक धावांची नोंद झाली. इंग्लंड विरुद्ध मितालीने नाबाद 75 धावांची खेळी केली. या अर्धशकासह वनडेत तिच्या खात्यात 58 अर्धशतकांची नोंद झाली आहे.

एडवर्ड्सला टाकले मागे

शार्लोट एडवर्ड्सने 309 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13 शतक आणि 67 अर्धशतकाच्या जोरावर 10 हजार 273 धावा केल्या आहेत. तिचा विक्रम मागे टाकत मितालीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 214 ही मितालीची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT