Nikolai Snesarev.jpg 
क्रीडा

धक्कादायक! बंद खोलीत मृतावस्थेत आढळले भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे परदेशी कोच

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- भारतीय क्रीडा जगतासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव हे पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले आहेत. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने याची माहिती दिली आहे. बेलारुसचे 72 वर्षीय निकोलई स्नेसारेव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ते सप्टेंबरपर्यंत या प्रशिक्षक पदासाठी भारतात परतले होते. 

एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला याबाबत म्हणाले की, ते शुक्रवारी झालेल्या इंडियन ग्रांपी 3 साठी बेंगळुरु येथून एनआयएसला परतले होते. त्यावेळी ते स्पर्धेसाठी आले नाहीत. त्यामुळे सायंकाळी इतर प्रशिक्षकांनी त्यांच्याबाबत विचारपूस केली. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. 

मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात
सुमारीवाला म्हणाले की, जेव्हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी निकोलई हे त्यांच्या पलंगावर पडलेले दिसले. एनआयएसमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. साईच्या टीमने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. आम्हाला त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. शवविच्छेदनानंतरच याबाबतची माहिती समोर येईल.  

स्नेसारेव हे 3000 मीटर स्टीपलचेज अ‍ॅथलिट अविनाश साबळे आणि इतर मध्य आणि लांब पल्ल्याच्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी प्रशिक्षण देत होते. अविनाश साबळेने त्यांच्याऐवजी लष्कराचे प्रशिक्षक अमरिश कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांच्याशी ऑलिम्पिकच्या अखेरीपर्यंत करार होता. कोरोनामुळे एक वर्षासाठी तो स्थगित करण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT