India Vs Australia : भारतीय संघ आजपासून आपली वर्ल्डकप 2023 मोहीम सुरू करत आहे. भारताचा पहिलाच सामना हा ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वीच भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेत भारताने 2 - 1 असा विजय मिळवला.
आता भारत वनडे वर्ल्डकप 2023 मधील ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला पहिला सामना चेन्नईमध्ये खेळणार आहे. जवळपास 36 वर्षानंतर भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईत भिडणार आहे. 1987 च्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया चेन्नईत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने फक्त 1 धावेने जिंकला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी चेन्नईत एकूण तीन वनडे सामने खेळले आहेत. 1987 नंतर 2017 मध्ये देखील चेन्नईत भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामना झाला होता. यात भारताने विज मिळवला होता. तसेच याच वर्षी मार्चमध्ये देखील दोन्ही संघ चेन्नईत भिडले. त्यात ऑस्ट्रेलियाने भारताला मात दिली होती. आता चौथ्यांदा भारत - ऑस्ट्रेलिया चेन्नईत खेळणार आहेत.
भारत - ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधील रेकॉर्ड
आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे एकूण 12 वेळा भिडले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवण्यात आघाडी घेतली आहे. कांगारूंनी 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त 4 सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देता आली आहे. भारतीय संघाने 1983, 1987, 2011 आणि 2019 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2003 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल सामना झाला होता. तर दोन्ही सघ 2015 च्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये एकमेकांसमोर आले होते. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वार्टर फायनल सामना झाला होता.
वनडेत कसे आहे भारत - ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेटमध्ये एकूण 149 सामने झाले आहेत. वर्ल्डकपमधील आजचा सामना हा 150 वा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत भारताविरूद्धचे 83 वनडे सामने जिंकले आहेत. तर भारताला 56 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. 10 सामन्या निकाल लागला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.