SAFF Championship 2023 
क्रीडा

SAFF Championship 2023 : भारताची SAFF चॅम्पियनशिप विजेतेपदाला गवसणी, रोमांचक लढतीत कुवेतचा पराभव

Sandip Kapde

SAFF Championship 2023 : दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 चा फायनल सामना कुवेत आणि भारत यांच्यात झाली. भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करत नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत गोल न झाल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 5 गोल केले तर कुवेतने केवळ 4 गोल केले.

भारताने उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनचा 4-2 असा पराभव केला तर कुवेतने बांगलादेशचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघ दुसऱ्यांदा कुवेतशी भिडला आहे. यापूर्वी अ गटातील दोघांचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता.

पहिल्या हाफमध्ये काय घडलं?

बेंगळुरूच्या श्रीकांतिरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पूर्वार्धात 1-1 असे बरोबरीत होते. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच कुवेतने भारतीय बचावफळी भेदून सामन्यात आपले खाते उघडले. मिडफिल्डर शाबीब अलखाल्डीने कुवेतसाठी पहिला गोल केला. सामन्याच्या 14व्या मिनिटाला त्याने हा गोल केला होता.

भारत आणि कुवेत यांच्यातील सामन्यात 9 वेळा एसएएफएफ चॅम्पिनयशिप जिंकणाऱ्या भारताचे पारडे जड होते. मात्र सामन्याच्या 14 व्या मिनिटालाच कुवेतच्या शाबिब अल खाल्दीने बुलैशीच्या साथीने भारतावर गोल केला. पहिल्या 15 मिनिटातच भारतावर गोल झाल्याने भारताने आपला खेळ वेगवान करण्याचा प्रयत्न केला.

भारताने हा गोल फोडण्यासाठी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान, संदेश झिंगनला पिवळे कार्ड मिळाले. त्यानंतर भारताने अन्वर अलीला बाहेर बोलवत मेहताब सिंगला मैदानावर उतरवले.

पहिल्या हाफमध्ये भारताचा गोल करण्यात भारताला 35 व्या मिनिटापर्यंत अपयश आले. मात्र अखेरीस छांगतेने 38 व्या मिनिटाला समादच्या सहाय्याने भारताचा पहिला गोल करत कुवेतशी बरोबरी साधली. (latest sport News)

पेनल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला

भारत आणि कुवेत यांच्यातील अंतिम सामना निर्धारित वेळेपर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. मात्र अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटने सामन्याचा निकाल लागला. भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 असा पराभव केला. अशाप्रकारे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी 9 व्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

या खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल केले

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून महेश सिंग, सुभाषीष बोस, लल्लियांझुआला चांगटे, संदेश झिंगन आणि सुनील छेत्री यांनी गोल केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

Gokul Chairman Election Controversy : 'जय-पराजय होतात, पण माझ्या मुलाबद्दल जे केलं त्याबद्दल फार खंत वाटते, ते जिव्हारी लागलंय'; हसन मुश्रीफांनी व्यक्त केलं दु:ख

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

SCROLL FOR NEXT