anushka and virat kohli love
anushka and virat kohli love  
क्रीडा

विराट-अनुष्कानं वाचवला मुलाचा जीव

नामदेव कुंभार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या पुढाकारामुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला आहे. अयांश गुप्ता या चिमुकल्यासाठी विराट-अनुष्का यांनी 16 कोटी रुपयांचा फंड जमा केला. याच पैशातून अयांश गुप्ताला जगातील सर्वात महागडं इंजिक्शन जोल्‍गेनस्‍मा दिलं गेलं. अयांश गुप्ता स्‍पाइनल मस्‍कुलर एट्रोफी या दुर्लभ आजारासोबत झुंज देत आहे. त्याच्या या लढ्यात विराट-अनुष्का यांनी मोलाची भूमिका बजावली. (Virat Kohli, Anushka Sharma help raise funds to save child's life)

स्‍पाइनल मस्‍कुलर एट्रोफी या आजारासोबत अयांश गुप्ता लढा देत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी अयांशच्या पालकांनी AyaanshFightsSMA या नावाचं ट्विटरवर खातं उघडलं होतं. अयांशसाठी लागणारं जगातील सर्वात महागडं जोल्‍गेनस्‍मा औषधं मिळालं असल्याची माहिती गुप्ता कुटुंबीयांन ट्विटरवर पोस्ट करत दिली होती. यासाठी त्यांनी विराट आणि अनुष्का शर्मा यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

‘AyaanshFightsSMA’ द्वारे असं ट्विट करण्यात आलं की, 'कोहली आणि अनुष्‍का तुमच्यावर आम्ही एक चाहते म्हणून नेहमीच प्रेम केलं. अयांशसाठी तुम्ही केलेली मदत कधीच विसरु शकत नाही. तुम्ही केलेल्या मदतीमुळे आम्ही जिवनाचा हा सामना जिंकू शकलो. धन्यवाद'

दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने कोरोना विरोधातील मोहिमेच्या माध्यमातून 7 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. अपेक्षित मदतीपेक्षा अधिक रक्कम या मोहिमेतून जमा झाली आहे. या मोहिमेअंतर्गत दोघांनी 11 कोटी इतकी रक्कम जमा केलीये. या जोडीने 2 कोटी रुपये जमा करत या मोहिमेला सुरुवात केली होती. ही रक्कम देशातील कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन खरेदीसह अन्य आरोग्यविषयक साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

SCROLL FOR NEXT