IND vs ZIM sakal
क्रीडा

IND vs ZIM : झिम्बाब्वेचा पराभव करत भारताने पाकिस्तानची ठेचली नांगी

झिम्बाब्वेला हरवून भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची केली बरोबरी

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेमध्ये अपेक्षेनुसार निर्भेळ यश संपादन केले. शुभमन गिलचे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक, इशान किशनची अर्धशतकी खेळी आणि कुलदीप यादव व अक्षर पटेल यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सोमवारी येथे झालेल्या अखेरच्या एकदिवसीय लढतीत यजमान झिम्बाब्वे संघावर 13 धावांनी विजय मिळवला. सिकंदर रझाने 115 धावांची खेळी साकारत झिम्बाब्वेच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. भारतीय संघाने 3-0 अशा फरकाने या मालिकेत बाजी मारली. हा सामना जिंकून भारताने पाकिस्तानच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने क्लीन स्वीप केला. भारतीय संघाने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 54 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध 62 सामने खेळले असून 54 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने उभा आहे.

धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेने 276 धावा फटकावल्या. सीन विल्यम्सने 45 धावांची खेळी केली, पण सिकंदर रझा याने 95 चेंडूंमध्ये 9 चौकार व 3 षटकारांसह 115 धावांची शानदार खेळी करीत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. शार्दूल ठाकूरने त्याला बाद केले आणि टीम इंडियाचा विजय निश्‍चित झाला.

दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन व के. एल. राहुल या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करीत आश्‍वासक सुरुवात केली. दुखापत व कोरोनामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणारा राहुल फॉर्ममध्ये येण्यासाठी प्रयत्न करताना दिसला, पण दुसऱ्या लढतीप्रमाणे याही लढतीत त्याला सूर गवसला नाही. ब्रॅड इव्हान्सच्या गोलंदाजीवर तो 30 धावांवर बाद झाला. इव्हान्सनेच धवनलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 40 धावांच्या खेळीत त्याने 4 चौकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला गिल व महत्त्वपूर्ण खेळीच्या प्रतीक्षेत असलेला इशान किशन याने तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी करताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. इशानने 61 चेंडूंत 6 चौकारांसह 50 धावांची खेळी केली. पण तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच धावचीत बाद झाला आणि जोडी तुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT