IND vs AUS 1st Test Day 1  esakal
क्रीडा

IND vs AUS 1st Test Day 1 : पहिल्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचे मनोबल तोडले; आधी जडेजाने नंतर रोहितने रडवले

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 1st Test Day 1 : नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोन सत्रातच 177 धावात संपवला. भारताकडून पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने 47 धावात निम्मा संघ ( 5 विकेट्स) गारद केला. तर अश्विनने 3 कांगारू टिपून त्याला चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशानेने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी (56) खेळीच्या जोरावर भारताने दिवसअखेर 1 बाद 77 धावांपर्यंत मजल मारून दिली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र सिराज - शमी जोडीने त्याची अवस्था 2 बाद 2 धावा अशी केली.

त्यानंतर मार्नस आणि स्मिथ या जोडीने कांगारूनां सावरले. त्यांनी लंचपर्यंत भारतीय फिरकीपटूंचा नेटाने सामना केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जडेजाने ही जोडी फोडली.

लंचनंतर दुसऱ्याच षटकात रविंद्र जडेजाने 49 धावांवर खेळणाऱ्या मार्नसला भरतकरवी स्टम्पिंग केले. जडेजा इथंच थांबला नाही. त्याने पुढेच्यात चेंडूवर मॅट रेनशॉला देखील आल्या पाहवली माघारी धाडले. जडेजाने 107 चेंडूत 37 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील बाद करत कांगारूंची अवस्था 5 बाद 109 धावा अशी केली.

यानंतर 68 चेंडूत 53 धावांची आक्रमक भागीदारी रचणाऱ्या कॅरी - हॅड्सकॉम्ब जोडीला अखेर आर. अशविननेच सुरूंग लावला. त्याने 33 चेंडूत 36 धावांची खेळी करणाऱ्या कॅरीचा काटा काढला. पाठोपाठ कर्णधार पॅट कमिन्सला देखील 6 धावांवर बाद करत अश्विनने आपली दुसरी शिकार केली. यानंतर जडेजाने टॉड मर्फीला शुन्यावर बाद करत चहापानापर्यंत कांगारूंची अवस्था 8 बाद 174 धावा अशी केली.

चहापानानंतर जडेजाने हँड्सकॉम्बला 31 धावांवर तर अश्विनने बॉलँडचा शुन्यावर त्रिफळा उडवत कांगारूचा डाव 177 धावात संपवला. जडेजाने 47 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या तर अश्विनने 3 विकेट्स घेत त्याला साथ दिली. मोहम्मद शमी - मोहम्मद सिराज या वेगवान जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताने चहापानानंतर आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. रोहितने 56 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या बाजूने केएल राहुल सावध फलंदाजी करत त्याला उत्तम साथ देत होता. मात्र दिवस संपायला 1 षटक राहिले असताना राहुल 20 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसअखेर भारताला 77 धावांपर्यंत पोहचवले. भारत अजून 100 धावांनी मागे आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT