SA vs IND esakal
क्रीडा

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला पडला! केप टाऊन सर करत भारताने रचला इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

South Africa Vs India 2nd Test : अखेर भारताने केप टाऊनचा किल्ला सर केलाच! भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदाही केप टाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला नव्हता. अखेर हा इतिहास बदलला असून भारताने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी पराभव केला. भारत हा केप टाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा आशिया खंडातील पहिला संघ ठरला आहे.

याचबरोबर 147 वर्षाच्या कसोटी इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी ही सर्वात कमी चेंडूत (642) संपलेली कसोटी ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव भारताने 55 धावात गुंडाळला होता. मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 153 धावा केल्या. रबाडा, एन्गिडी अन् बर्गरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने एडिन मार्करमच्या झुंजार 106 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 176 धावा केल्या. त्यांनी दुसऱ्या डावात 78 धावांची आघाडी घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स तर मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या.

भारताला विजयासाठी 79 धावांची गरज होती. सलामीवीर यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत 23 चेंडूत 28 धावा ठोकल्या. पहिल्या सहा षटकातच भारताने 44 धावांपर्यंत मजल मारली. अखेर शुभमन गिल आणि रोहित शर्माने संघाला 57 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर गिल 10 तर विराट कोहली 12 धावा करून बाद झाला. अखेर रोहित शर्माने 17 धावा करत भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रोहित शर्मा हा भारताचा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका बरोबरीत सोडवणारा दुसरा कर्णधार ठरला. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने देखील आफ्रिकेत कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याची कामगिरी केली होती.

याचबरोबर रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेत केप टाऊन कसोटी जिंकणारा आशिया खंडातील पहिला कर्णधार ठरला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT