India Cricket Jersey Sponsor Adidas esakal
क्रीडा

India Cricket Jersey Sponsor : बीसीसीआय करणार मोठी डील; आता WTC फायनलसाठी टीम इंडियाच्या जर्सीवर...

अनिरुद्ध संकपाळ

India Cricket Jersey Sponsor Adidas : भारताने कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन कसोटीत अडीच दिवसात गुंडाळले. भारताने चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताचे WTC फायनलमधील स्थान जवळपास पक्के झाला आहे. WTC फायनल ही 7 जूनला ओव्हल येथे होणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयने या फायनलची आतापासूनच जय्यत तयारी करण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआय अदिदास सोबत मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. जर सगळं काही व्यवस्थित झालं तर अदिदास ही भारतीय जून पासून क्रिकेट संघाच्या जर्सीची स्पॉन्सर होईल. ही नवी जर्सी रोहित सेना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा घालण्याची शक्यता आहे.

भारतीय संघची जर्सी पार्टनर ही सध्या किलर जीन्स आहे. त्यांनी एमपीएलकडून हे प्रायजक पद घेतले होते. मात्र बीसीसीआय आता प्रसिद्ध प्रसिद्ध ब्रँडशी जोडली जाणार आहे. 2016 आणि 2020 मध्ये नायकी भारताच्या किटचे स्पॉन्सर होते.

एमपीएलने भारतीय जर्सी प्रायोजकासाठी 2016 मध्ये बीसीसीआयशी 370 कोटी रूपयांचा करार केला होता. हा करार डिसेंबर 2023 पर्यंत होता. मात्र त्यापूर्वीच एमपीएलने करार कीलर जिन्सकडे हस्तांतरित केला. किलरने बांगलादेश दौऱ्यापासून भारतीय संघाचे जर्सी प्रायोजक आहे. किलरकडे कोणत्याही स्पोर्ट्स किट तयार करण्याचा अनुभव नाही.

त्यामुळे बीसीसीआयच्या ब्रँड इमेजमध्ये किलर फिट बसत नाही. अनेक मोठे खेळाडूंना नायकी, अदिदास आणि प्यूमा स्पॉन्सर करतात. त्यामुळे बीसीसीआय देखील यापैकी एका ब्रँडसोबत करार करू इच्छिते.

यापूर्वी अदिदास मुंबई इंडियन्स आणि इंग्लंड क्रिकेट संघाची जर्सी स्पॉन्सर राहिले आहे. सध्याच्या भारतीय संघातील रोहित शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंतला अदिदास स्पॉन्सर करते. आता भारतीय क्रिकेट संघाचे जर्सी प्रायोजक होत अदिदास पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट वर्तुळात प्रवेश करणार आहे. अदिदासचा सध्या फक्त नॉटिंगहॅमशायर, साऊथ इस्ट स्टार आणि सरे या संघांसोबत प्रायजक करार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT