India Vs Ireland 1st T20I  ESAKAL
क्रीडा

IND vs IRE 1st T20 : पावसाने केला खेळ! भारताचा अवघ्या 2 धावांनी विजय

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Ireland 1st T20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने याच्या प्रत्युत्तरात 6.5 षटकात 2 बाद 47 धावा केल्या होत्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला. बराच काळ पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. अखेर पंचांनी सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार देण्याचा निर्णय घेतला.

डकवर्थ लुईस नियमानुसार सामना जिंकण्यासाठी भारताला 6.5 षटकात 45 धावा करणे गरजेचे होते. खेळ थांबला होता त्यावेळी भारताच्या 6.5 षटकात 47 धावा झाल्या होत्या. त्यामुळे भारताने सामना 2 धावांनी जिंकला. (Jasprit Bumrah Man Of The Match)

आयर्लंडचे 140 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने पहिल्या 6 षटकात दमदार फलंदाजी करत बिनबाद 45 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर यशस्वी जैसवालने 24 धावा केल्या होत्या तर त्याला साथ देणाऱ्या ऋतुराज गायकवाडने नाबाद 18 धावा केल्या होत्या.

भारताची ही सलामी जोडी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच क्रेग यंगने भारताला सातव्या षटकात सलग दोन धक्के दिले. त्याने यशस्वी जैसवालला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माला पुढच्याच चेंडूवर शुन्यावर बाद केले. यानंतर आलेल्या संजू सॅमसनने आल्या आल्या एक धाव करत भारताला 47 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. खेळ थांबला त्यावेळी भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी 6.5 षटकात 45 धावा करणे गरजेचे होते. भारताच्या त्यावेळी 47 धावा झाल्या होत्या. अखेर पावसाने काही उसंत दिली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले. सामनावीराचा पुरस्कार हा कर्णधार जसप्रीत बुमराहला मिळाला.

भारत आणि आयर्लंड यांच्याविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडची अवस्था 6 बाद 59 धावा अशी केली असताना बॅरी मॅकार्थेने 33 चेंडूत 51 धावांची खेळी करत आयर्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT