India Defeat South Africa In 3rd ODI Won Series By 2 - 1  esakal
क्रीडा

IND vs SA ODI : विजयाचं 'शिखर' सर; टीम इंडियाच्या दुय्यम संघाने बलाढ्य आफ्रिकेला पाजले पाणी

अनिरुद्ध संकपाळ

India vs South Africa 3rd ODI : भारताने दक्षिण आफ्रिकेचे 100 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पार करत मालिका 2 - 1 अशी खिशात टाकली. भारताकडून शुभमन गिलने 49 तर श्रेयस अय्यरने नाबाद 28 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने भेदक मारा करत 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून क्लासेनने सर्वाधिक 34 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिलने चांगली सुरूवात केली. मात्र शिखर धवन 14 चेंडूत 8 धावा करून धावबाद झाला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला 10 व्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली.

दरम्यान, शिखर धवन बाद झाल्यानंतर आलेल्या इशान किशनने 18 चेंडूत 10 धावा करून गिलची साथ सोडली. किशन बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवली. दरम्यान, शुभमन गिल देखील अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र अर्धशतकाला फक्त 1 धाव गरजेची असताना एन्गिडीने त्याला पायचीत बाद केले. अखेर श्रेयस अय्यरने षटकार मारत समना संपवला.

तत्पूर्वी, पावसाच्या छायेखाली सुरू झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजने क्विंटन डिकॉक (6) आणि जानेमान मलानला (15) स्वस्तात बाद करत सार्थ ठरवला.

दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर गेल्या सामन्यातील हिरो रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररम यांनी सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र सिराजने हेंड्रिक्सला 3 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. सिराजने शॉर्टबॉलचा हुशारीने वापर करत आधी मलान आणि नंतर हेंड्रिक्सला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदने माक्ररमला 9 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 43 धावा अशी झाली होती. काळजीवाहू कर्णधार डेव्हिड मिलर क्रिजवर आला. मात्र वॉशिंग्टन सुंदरने त्याला 7 धावांवर त्रिफळा उडवत मालिकेत नाबाद राहण्याची मिलरची परंपरा खंडित केली. आफ्रिकेचा निम्मा संघ 66 धावात माघारी गेल्यानंंतर कुलदीप यादवने फेलुकवायोला 5 धावांवर बाद करत आफ्रिकेचा पाय अजूनच खोलात नेला. त्यानंतर शाहबाज अहमदने हैनरिच क्लासेननची 34 धावांची झुंजार खेळी संपवत आफ्रिकेची अवस्था 7 बाद 93 धावा अशी केली.

यानंतर कुलदीप यादवने 26 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर फॉर्ट्युनला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एर्निच नॉर्त्जेचा शुन्यावर त्रिफळा उडवला. कुलदीप यादव हॅटट्रिक चान्सवर होता. एन्गिडीने कुलदीपचा पुढचा चेंडू अडवला आणि हॅटट्रिक चान्स हुकला. मात्र पुढच्या षटकात कुलदीपने मार्को जेनसेला 14 धावांवर बाद करत आफ्रिकेचा डाव 99 धावांवर संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT