India Playing XI 3rd T20 IND vs SL esakal
क्रीडा

India Playing XI 3rd T20 : तिसऱ्या सामन्यात किती बदल; कॅप्टन पांड्या अर्शदीपसोबत गिललाही दाखवणार बाहेरचा रस्ता?

अनिरुद्ध संकपाळ

India Playing XI 3rd T20 IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना आज राजकोट येथे खेळवला जाणार आहे. मालिका 1 - 1 बरोबरीत असल्याने आजच्या सामन्यावरच मालिका कोणाच्या खिशात जाणार हे निश्चित होईल. भारतीय संघाला गेल्या दोन सामन्यात लंकेने चांगलेच झुंजवले होते.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अनेक चुका केल्या अर्शदीप सिंगने 5 नो बॉल टाकले. आजच्या तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या त्याला पुन्हा संधी देणार की त्याच्या नावावर खाट मारणार हे पहावे लागेल. तसेच टी 20 पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलला दोन सामन्यात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात हार्दिक बेंचवर बसलेल्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार का हे प्रश्न आहेतच.

अर्शदीप हार्दिकबद्दल काय म्हणाला?

'एकादा दिवस चांगला असतो तर एक दिवस खराब जातो. मात्र तुम्ही बेसिक चुका करू शकत नाही. अर्शदीपसाठी सध्याची परिस्थिती खूप अवघड आहे. आधीही त्याने नो बॉल टाकले आहेत. मी त्याला दोष देत नाहीये किंवा रागवत नाहीये. मात्र नो बॉल टाकणे हा गुन्हाच आहे.'

तिसऱ्या टी 20 सामन्यात कोणते बदल होऊ शकतात?

- शुभमन गिलच्या टी 20 कारकिर्दिची सुरूवात चागंली झालेली नाही. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे.

- जरी पहिल्या सामन्यात राहुल त्रिपाठीला फारशी चमक दाखवता आली नसली तरी त्याची संघातील जागा जाण्याची शक्यता नाही. त्याला 13 सामने बेंचवर बसल्यानंतर 11 च्या संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.

- गोलंदाजीत राजकोटवर भारतीय संघ एक अतिरिक्त फिरकीपटू खेळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगला संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

- शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचे स्थान जाण्याची शक्यता नाही.

(Sports Latest News)

IND vs SL 3rd T20 भारताची प्लेईंग 11

इशान किशन

शुभमन गिल / ऋतुराज गायकवाड

राहुल त्रिपाठी

सूर्यकुमार यादव

हार्दिक पांड्या

दीपक हुड्डा

अक्षर पटेल

अर्शदीप सिंग / वॉशिंग्टन सुंदर

शिवम मवी

उमरान मलिक

युझवेंद्र चहल / कुलदीप यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT