India playing XI for 1st ODI vs WI sakal
क्रीडा

IND vs WI: कोणाचा पत्ता कट अन् वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत कोणाला मिळणार संधी ? जाणून घ्या Playing11

सकाळ ऑनलाईन टीम

India playing XI for 1st ODI vs WI : आजपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने भारत 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचे काही वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत, त्यामुळे रोहित त्याच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार नाही, परंतु या मालिकेद्वारे त्याचे डोळे वर्ल्ड कपसाठी बॅकअप पर्याय शोधण्यावर असतील.

अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवपासून ते इशान किशन, संजू सॅमसन आणि उमरान मलिक या खेळाडूंना निवड समितीच्या नजरेत स्वत:ला आणण्याची उत्तम संधी असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घेऊया....

भारताच्या पहिल्या तीनमध्ये कोणत्याही बदल पाहिला मिळणार नाही. कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल डावाची सुरुवात करताना दिसणार आहे, तर किंग कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. वर्ल्ड कपमध्येही भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये कोणताही बदल होणार नाही.

इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर इशान किशनला डावखुरा फलंदाज म्हणून आजमावू शकतो, जो विश्वचषकात केएल राहुलचा बॅकअप बनू शकतो. संघात संजू सॅमसन देखील असेल जो या पदासाठी ईशान किशनशी स्पर्धा करणार आहे.

याशिवाय हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर येईल. हार्दिकने आयपीएलसह टी-20 क्रिकेटमध्ये 4-4 षटके टाकली आहेत, आता तो वनडेमध्ये पूर्ण 10 षटके टाकू शकतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. भारताने शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली तेव्हा हार्दिकने एकाही सामन्यात 10 षटके टाकली नाहीत.

याशिवाय सूर्यकुमार यादवसह रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या संघात फिनिशरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर जडेजा आणि अक्षर यांच्याशिवाय कुलदीप यादवला फिरकी विभागात स्थान मिळू शकते. विंडीजची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त असल्याचे कसोटी मालिकेदरम्यान दिसून आले. अशा स्थितीत रोहित तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकतो.

मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज कसोटीप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार होता, परंतु या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त आले आहे. अशा परिस्थितीत जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांच्यापैकी कोणत्याही दोन गोलंदाजांना संधी मिळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन/संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Disruption : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-ठाणे लोकल रेल्वेसेवा खोळंबली, प्रवाशांचे प्रचंड हाल

Kolhapur Crime News : डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांना चावून बोटचं तोडलं, छातीवर लाथ मारली अन्; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

आनंदाची बातमी ! धावत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, हेल्पलाइनवरून परत मिळवा; साखळी खेचल्यास हाेणार दंड; मदतासाठी काय करावा लागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT