India vs Zimbabwe sakal
क्रीडा

Ind vs Zim : भारताने 10 विकेटने 8 व्यांदा जिंकला सामना, पहिला विजय कधी मिळाला जाणून घ्या

ZIM vs IND : धवन - गिलची विक्रमी सलामी; झिम्बावे विरूद्ध भारताचा सलग 13 वा विजय

Kiran Mahanavar

India vs Zimbabwe : भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा पराभव केला. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करताना झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 189 धावांत आटोपला. 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 30.5 षटकात 192 धावा करत सामना जिंकला. भारताकडून शिखर धवनने नाबाद 81 आणि शुभमन गिलने 82 धावा केल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने एकदिवसीय सामना 10 विकेट्सने जिंकला ही पहिलीच वेळ नाही. भारतीय संघाने 8 एकदिवसीय सामने 10 विकेट्सने जिंकले आहेत. भारतीय संघाने यापूर्वी 1998 आणि 2016 मध्ये झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय मिळवला होता. भारताविरुद्ध झिम्बाब्वेला तिसऱ्यांदा 10 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला आहे.

भारताने पहिला एकदिवसीय सामना 1974 मध्ये खेळला होता. त्यानंतर वर्षभरानंतर भारतीय संघ 1975 च्या विश्वचषकात उतरला. टीम इंडियाला वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत मजल मारता आली नाही. मात्र या निराशाजनक कामगिरीतही तिने इतिहास रचला. त्यांनी पूर्व आफ्रिकेचा 10 विकेट्ने पराभव केला. तसेच हा भारताचा पहिला विजय ठरला. अशाप्रकारे भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 विकेट्सच्या फरकाने पहिला विजय नोंदवला.

सामनाबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने चांगली सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या, पण पहिला विकेट पडताच संपूर्ण संघ कोलमडला. झिम्बाब्वेचे चार फलंदाज 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर सिकंदर रझा आणि कर्णधार चकाबवा यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 35 धावा जोडल्या, पण फेमसने रझाला बाद करून ही भागीदारी तोडली.

110 धावांवर झिम्बाब्वेने आठ विकेट गमावल्या होत्या, परंतु यानंतर इव्हान्स आणि नागरवा यांच्यातील शानदार 70 धावांची भागीदारी झाली आणि झिम्बाब्वेचा संघ अखेरीस 189 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताची सलामी जोडी शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी करत 192 धावांची सलामी भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT