India Star Opener Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environment esakal
क्रीडा

बायो बबलमुळे टीम बॉडिंग वाढलं; आता जुळवून घ्यायला वेळ लागेल : ऋतुराज

अनिरुद्ध संकपाळ

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. तिसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. त्याने धडाकेबाज सुरूवात करत 57 धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला बायो बबलमध्ये असताना आणि बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतरचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारण्यात आला. (Ruturaj Gaikwad Statement About Bio Bubble Free Environment)

त्यावेळी ऋतुराज गायकवाडने 'आम्ही बायो बबलमध्ये बराच काळ राहिलो. मात्र मला जाणवलेली बायो बबलमधील चांगली गोष्ट म्हणजे यामुळे संघातील बॉडिंग वाढले. मी ज्या कोणत्या संघाकडून खेळलो मग ते आयपीएल असो किंवा टीम इंडिया तेथे सांघिक भावना वाढवण्यासाठी भरपूर उपक्रम राबवण्यात आले. याचा चांगलाच फायदा झाला. येणाऱ्या पुढच्या वर्षात देखील याचा फायदा होईल.'

ऋतुराज पुढे म्हणाला की, 'बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर तुमच्या अवती भोवती खूप लोक जमा होतात. ही बायो बबलमधून बाहेर आल्यानंतरची पहिलीची मालिका आहे. त्यामुळे सर्वांनाच या परिस्थितीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल.'

'कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही एका बंदिस्त वातावरणात होतो. लोक तुमच्याकडे येत नव्हते. त्यामुळे बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर अनेक चाहते जवळ येत आहेत. अनेक गोष्टींची मागणी करतात. सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला खूप अटेंशन मिळत आहे. यामुळे मन विचलित देखील होते. त्यामुळे बायो बबलचे काही फायदे आणि तोटेही आहेत. माझ्या मते हे दोन्ही अनुभव तुम्ही घेतले पाहिजे.'

ऋतुराज गायकवाड गंमतीने म्हणाला की, 'बायो बबल मधून बाहेर आल्यानंतर सर्वात मोठा बदल हा पत्रकार परिषदेत झाला आहे. डिजीटल पत्रकार परिषदेत तुम्हाला काही ऐकू येत नाही किंवा नेटवर्कची समस्या असू शकते. तुम्ही त्यावेळी प्रश्न टाळू शकत होता. आता मात्र तुम्हाला प्रश्न टाळता येणार नाहीत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: 11 जुलैला नवे इंधन दर जाहीर! मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Pimpri: ढासळणाऱ्या कचऱ्याने बचावात अडथळे ; मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारत मोकळी करण्याला प्राधान्य; पथकाची हतबलता

FDA Maharashtra Raid : तुकाराम मुंढेंचा दणका! महाराष्ट्रात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA ची मोठी कारवाई, 90 लाखांचा साठा जप्त; पुणे, नांदेड, बीड, सोलापुरात छापे

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT