india vs Pakistan sakal
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup : अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान?, जाणून घ्या समीकरण

फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाचे समीकरणे काय आहेत पाहू.

Kiran Mahanavar

india vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कपमधील सुपर फोरचे सामने सुरू झाले आहेत. चारही संघाना एक-एक सामना खेळला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी पहिला सामना जिंकला आहे, तर भारत आणि अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या पाक आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, मात्र भारत आणि अफगाणिस्तानलाही उर्वरित दोन सामने जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. सर्व संघांचे दोन सामने बाकी असून आता चारही संघांना विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याची संधी आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाचे समीकरणे काय आहेत पाहू.

सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला अजून दोन सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचू शकतो.

पाकिस्तान संघाने सुपर फोरमधील पहिला सामना जिंकला आहे. पाकिस्तानसाठी अंतिम फेरीचा मार्ग सर्वात सोपा आहे. आता त्याचे दोन्ही सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध आहेत. उरलेले दोन सामने पाकिस्तानने जिंकले तर फायनलमध्ये सहज पोहोचेल.

श्रीलंकेच्या संघाने सुपर फोरमधील पहिला सामनाही जिंकला असून उर्वरित दोन सामने जिंकून फायनलमध्ये सहज प्रवेश करू शकतो. पुढील सामन्यात भारताला पराभूत करणे त्याच्यासाठी खूप कठीण असेल. यानंतर हा संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. श्रीलंकेचा संघ या दोन्हीपैकी एकही सामना जिंकू शकला, तर तो अंतिम फेरीत पोहोचू शकतो.

अफगाणिस्तानला सुपर फोरमधील पहिल्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. या संघाची समीकरणेही पूर्णपणे भारतासारखी आहेत. मात्र भारताच्या तुलनेत अफगाणिस्तानचा संघ कमकुवत आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तानला पुढील दोन सामन्यांमध्ये पराभूत करणे या संघासाठी खूप कठीण असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT