क्रीडा

भारताचं WTC 2 चं वेळापत्रक जाहीर; या देशांसोबत मुकाबला

नामदेव कुंभार

पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC) सर्धेत भारताचा पराभव करत न्यूझीलंडनं जेतेपद मिळवलं. 2021 ते 2023 या कालावधीत दुसरी वश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. दुसऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची तयारी भारताने सुरु केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरोधातील पाच कसोटी मालिकेपासून भारत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ करणार आहे.

विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेत भारत न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरोधात खेळणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार तीन स्वदेसात तर तीन विदेशात मालिका होणार आहेत. त्यानुसार, न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधात घरच्या मैदानावर भारत खेळणार आहे. तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरोधात दौऱ्यावर भारतीय संघ असणार आहे. चार ऑगस्टपासून सुरु होणारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील असेल. भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आहे.

ESPNCricinfo च्या वृत्तानुसार, WTC 2 ची सुरुवातही ऑगस्ट 2021 पासून होणार आहे. तर जून 2023 मध्ये अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्याचं ठिकाणावर अद्याप शिक्कामोर्तब झालेल नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी मालिका आणि इंग्लड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील. या दोन मालिकाच फक्त पाच कसोटी सामन्याच्या असतील. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणारी कसोटी मालिका चार सामन्याची असेल. चार कसोटी सामन्याची ही एकमेव मालिका असेल. तर तीन कसोटी सामन्याच्या सात मालिका होणार आहे. तर दोन कसोटी सामन्याचा 13 मालिका होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Pune Railway: पुणे रेल्वे स्थानकावर मोठा बदल! जनरल प्रवाशांना थेट फलाटावर जाता येणार नाही; २२ कोटींचे होल्डिंग एरिया तयार

Marathi News Live Updates : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते? हुसैन दलवाईंचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंबाबतही केला खुलासा

Kolhapur Maternal Death : आंतरजातीय प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी शेवट! आठव्या महिन्यात सिझेरियन, बाळाला जन्म देताच काही क्षणांतच आईने सोडला प्राण

SCROLL FOR NEXT