kohli and root
kohli and root file photos
क्रीडा

टीम इंडिया इंग्लंडला घरातही रडवणार, गावसकरांची भविष्यवाणी

सुशांत जाधव

India Tour Of England : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मेगा फायनलनंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी टीम इंडिया कशी कामगिरी करणार? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये. आयसीसी वर्ल्ड टेस्ट फायनलनंतर दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया यजमान इंग्लंडला हिसका दाखवण्यासाठी मैदानात उतरेल. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसंदर्भात लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केलीये. भारतीय संघ इंग्लंड विरुद्धची ही मालिका 4-0 अशी जिंकेल, असे गावसकरांनी म्हटले आहे. (India Tour Of England Sunil Gavaskar Prediction On India England Test series)

गावसकर एका वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर सहा आठवड्यांनी भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध खेळायचे आहे. या परिस्थितीत वर्ल्ड टेस्ट फायनलच्या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 4-0 अशी बाजी मारेल, असे वाटते.

यावेळी त्यांनी खेळपट्टीसंदर्भातही भाष्य केले. भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हिरवळीवर खेळावे लागेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. इंग्लंडचा संघ ज्यावेळी भारतीय दौऱ्यावर आला होता त्यावेळी खेळपट्टीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे आगामी दौऱ्यात भारतीय संघासाठी ते हिरवळ असणारी खेळपट्टी तयार करतील, यात काहीच शंका वाटत नाही, असे गावसकरांनी सांगितले. खेळपट्टीवर गवत असले तरी भारतीय संघाला कसोटी जड जाणार नाही. इंग्लंडच्या संघातील फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता भारतीय गोलंदाजात आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रुटने न्यूझीलंड आणि भारतीय संघाला व्हाईट वॉश देण्याची गोष्ट केली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला न्यूझीलंड आणि भारतीय संघासोबत मोठी टक्कर द्यावी लागेल. कसोटीत टॉपला असलेल्या या दोन संघाला क्लीन स्वीप करुन अ‍ॅशेससाठी माहोल तयार करण्याचे भाष्य जो रुटने केले होते. त्यानंतर आता गावसकरांनी वर्तवलेला अंदाज हा टीम इंडिया जो रुटच्या मनसुब्यांना उधळून लावणार असाच आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला टीम इंडियाने पळताभुई थोडी करून सोडले होते. आता घरच्या मैदानातही इंग्लंडवर तशीच वेळ येईल, असेच गावसकरांची भविष्यवाणी सांगते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT