India Tour of Ireland Rohit Sharma 2 T20I Before England Series sakal
क्रीडा

आनंदी आनंद गडे! वेळात वेळ काढून टीम इंडिया आयर्लंडला जाणार

Kiran Mahanavar

रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया एका मागून एक मालिका खेळताना दिसते आहे. वेस्ट इंडीज पाठोपाठ टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असतील. एवढेच नाहीत तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे. जूनमध्ये टीम इंडिया दोन सामन्यांच्या T-20 मालिकेसाठी आयर्लंडला जाणार आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारताशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही आयर्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहेत.

IPL नंतर टीम इंडिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाईल आणि दोन T20 सामने 26, 28 जून रोजी मालाहाइडमध्ये खेळवले जातील. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे.

टीम इंडिया 4 वर्षांनंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. याआधी 2018 मध्ये 2 T-20 सामन्यांच्या मालिकेसाठी गेली होतो. मालिका 2-0 ने जिंकली होती. याशिवाय, 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा आयर्लंडचा दौरा केला आणि दोन्ही संघांमधील एकमेव टी-20 खेळला होता. जो भारतीय संघाने 9 गडी राखून जिंकला होता.

आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील सर्व सामने 9 जून ते 15 जून दरम्यान खेळवले जाणार आहे. भारताला आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्यावर जायचे असल्याने टीम इंडियाच्या अनेक स्टार खेळाडूंना आयर्लंड मालिकेसाठी विश्रांतीही मिळू शकते.

खेळाडू आयर्लंडहून इंग्लंडला जातील

आयर्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये, टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेली होती, परंतु शेवटची कसोटी कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती. मालिका रद्द होण्यापूर्वी भारताने कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली होती. 2022 मध्ये टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याला शेवटच्या कसोटीने सुरुवात करेल. जर भारत 5वी कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला तर 15 वर्षे इंग्लंड मातीवर कसोटी मालिका जिंकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT