Vicky Ostwal  Sakal
क्रीडा

VIDEO : विकीनं मिकीला टाकलेला हा चेंडू एकदा बघाच!

सुशांत जाधव

ICC Under 19 World Cup 2022 : वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धच्या 14 व्या हंगामात युवा टीम इंडियाने दमदार सुरुवात केलीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्यांनी 45 धावांनी विजय नोंदवला. यश धूलच्या नेतृत्वाखालील संघाला विजय मिळवून देण्यात पुण्याच्या विकी ओस्तवाल यानेही मोलाचा वाटा उचलला होता.

पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची (U19 India) सुरुवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार यश धूलनं (Yash Dhool) 82 धावांची खेळी करुन संघाचा डाव सावरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर युवा टीम इंडियाने (U19 India) 232 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना विकी ओस्तवालनं (Vicky Ostwal) आफ्रिकेच्या फलंदाजांची फिरकी घेतली. 5 विकेटसह आफ्रिकेचं कंबरडे मोडून विकीनं संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

युवा टीम इंडियातील लेफ्ट-आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या फिरकीतील जादू आयसीसीलाही भावली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विकीनं मिकी कोपलँड (Mickey Copeland) याला बोल्ड केलं होतं. त्याने जो चेंडू टाकला होता तो कमालीचा होता. त्याने परफेक्ट लेग स्पिनवर कोपलँडची ऑफ स्टंम्प उडवली. त्याचा हा चेंडू भविष्यात तो घातक फिरकीपटू होण्याचे संकेत देणारा आहे. आयसीसीने विकीचे कौतुक करत त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये राशिद खान आपल्या लेग स्पिनने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना नाचवताना दिसते. भारताकडून युजवेंद्र चहलनेही आपल्या फिरकीतील अशा प्रकारेच जादू दाखवून दिली होती. रवि बिश्नोई हा भारतीय संघाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत आहे. या पक्तींत उद्या विकीच नाव पाहायला मिळालं तर नवल वाटणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : निलंबित कर्मचाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT