India v Netherlands Sydney Weather Forecast sakal
क्रीडा

IND vs NED Weather : इंग्लंड-न्यूझीलंडनंतर पाऊस भारताचा खेळ करणार खराब!

पावसाने ऑस्ट्रेलियातील अनेक संघांचा खेळ खराब केला, आता भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यादरम्यान पाऊस येणार ....

Kiran Mahanavar

India v Netherlands Sydney Weather Forecast : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पावसाने आतापर्यंत अनेक संघांचा खेळ खराब केला आहे. आता भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यातही पाऊस अडथळा ठरू शकतो. भारताने पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला होता या सामन्यादरम्यानही पावसाची शक्यता होती. मेलबर्नमध्ये हवामान सामन्यापूर्वी स्वच्छ झाले आणि पूर्ण 40 षटकांचा सामना पाहिला मिळाला.

टी-20 विश्वचषकात भारताचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध असून टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारताचे दोन गुण होतील आणि चार गुणांसह टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानावर पोहोचेल. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारताला एक गुण गमवावा लागू शकतो. डकवर्थ लुईस नियमानुसार जर सामन्याचा निकाल लागला तर इंग्लंडप्रमाणेच भारतही सामना गमावू शकतो.

टी-20 विश्वचषक मध्ये आतापर्यंत तीन मोठ्या संघांचा खेळ पावसाने खराब केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात सर्वप्रथम पाऊस पडला. आफ्रिकन संघ हा सामना जिंकण्याच्या मार्गावर होता. पण पावसामुळे सामना रद्द झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा एक गुण गमवावा लागला. यानंतर इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात पाऊस आला. सामन्यापूर्वी इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र पावसामुळे परिस्थिती बदलली आणि अखेरीस आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना पाच धावांनी जिंकला.

भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही आणि तापमान 24 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. मात्र आकाश ढगाळ राहील. त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ढगांची उपस्थिती वेगवान गोलंदाजांना मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT