Ind vs Afg 3rd T20 sakal
क्रीडा

Ind vs Afg 3rd T20 : 22 वरून 4 टीम इंडिया 212 वर 4...! बेंगळुरूमध्ये रोहित अन् रिंकूचे तुफान

India vs Afghanistan 3rd T20 News |

Kiran Mahanavar

India vs Afghanistan 3rd T20 Score : भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. ज्यांचा तिसरा म्हणजेच शेवटचा सामना आज बेंगळुरूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 212 धावा केल्या. आता अफगाणिस्तान संघासमोर 213 धावांचे लक्ष्य आहे.

या सामन्यात एकेकाळी भारतीय संघाने 22 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यशस्वी 4 धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे (1) आणि संजू सॅमसन (0) देखील बाद झाले आहेत. मात्र यानंतर रोहित शर्माने रिंकू सिंगच्या साथीने डावाची धुरा सांभाळत 5व्या विकेटसाठी 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी केली.

यानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा 64 चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यानंतर रिंकू सिंगने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे अर्धशतकही झळकावले.

त्याने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात रोहितने 69 चेंडूत नाबाद 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 षटकार आणि 11 चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूने 39 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 6 षटकार आणि 2 चौकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT