India vs Argentina FIFA Match esakal
क्रीडा

India vs Argentina FIFA Match : एकेकाळी भारत खेळत होता फिफा, काय झालं जेव्हा अर्जेंटीना विरुद्ध खेळली होती मॅच

फिफाची क्रेझ फायनल संपली तरी सुरूच

सकाळ डिजिटल टीम

India vs Argentina FIFA Match : फिफाची क्रेझ फायनल संपली तरी सुरूच आहे, कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये लिओनल मेसीची अर्जेंटीना टीम जिंकली. फुटबॉल विश्वात अर्जेंटीना परत एकदा बादशहा ठरली आहे, यावेळेस त्यांच्यासोबत फ्रांसची टीम होती.

दोघंही टीमने एकमेकांना खूप जोरदार टक्कर दिली होती. मेसीचे फॅन जगभर आहेत, भारतातही त्यांची कमतरता नाही, भारताची टीम फिफा साठी क्वालिफाय होऊ शकली नाही, पण जवजवळ 39 वर्षांपूर्वी भारताने अर्जेंटीना सोबत मॅच खेळली होती.

आत्तापर्यन्त फक्त एकदा भारत आणि अर्जेंटीना मध्ये फुटबॉल मॅच झाली आहे. नेहरू कप टुर्नामेंटमध्ये 13 जानेवारी 1984 रोजी ही मॅच झालेली. अर्जेंटीनाने आपला पहिला वर्ल्ड कप 1978 मध्ये जिंकला होता. यानंतर 1986 मध्ये त्यांनी आपला दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा सुद्धा अर्जेंटीना खूप स्ट्रॉंग टीम मानली जायची.

अर्जेंटीनाला मॅचमध्ये भारताने वाढीव टक्कर दिली होती

ही मॅच कलकत्ताच्या इडन गार्डन मध्ये खेळली गेलेली. तेव्हा ही मॅच बघायला जवळजवळ 50 हजार लोकं आले होते. तेव्हा इंडियन टीममध्ये विश्वजित भट्टाचार्य, रवि आणि बाबू मणी हे दिग्गज प्लेयर होते. तर अर्जेंटीना टीममध्ये रिकार्डो गारेगा, जॉर्ज बुर्रुचागा आणि रिकार्डो गिऊस्ती हे दिग्गज प्लेयर होते.

या मॅचमध्ये भारताने अर्जेंटीनाला वाढीव टक्कर दिली होती. फर्स्ट हाल्फ मध्ये भारताने अर्जेंटीनाला एकही गोल घेऊ दिला नाही आणि स्कोर 0-0 असा होता पण सेकंड हाल्फमध्ये अर्जेंटीनाने आपली पूर्ण ताकद लावली आणि रिकार्डो गारेगाने 79 व्या मिनिटाला पहिला गोल केलेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT