where to watch free matches ind vs aus t20 sakal
क्रीडा

IND vs AUS : टीम इंडिया खेळणार नवीन जर्सीमध्ये, जाणून घ्या 'फ्री' सामना कुठे अन् कधी पाहायचा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

Kiran Mahanavar

India vs Australia 1st T20 : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान टी-20 विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. यासाठी आता फक्त एक महिना उरला आहे. याआधी सर्व संघांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. टीम इंडिया मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापन टी-20 विश्वचषकापूर्वी संघातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतील.

आशिया कप मध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्लेइंग 11 वर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. रोहित आतापर्यंत अचूक खेळाडू निवडू शकला नसल्याचा आरोप माजी क्रिकेटपटूंनी केला. त्याचवेळी कर्णधार रोहित म्हणाला होता की, त्याला टी-20 विश्वचषकापूर्वी सर्व प्रयोग करायचे आहेत जेणेकरून त्याच्याकडे पुरेसे पर्याय होतील. मात्र आता भारतीय संघाला टी-20 विश्वचषकापूर्वी अनेक टी-20 सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार आणि संघ व्यवस्थापन आपली तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

या सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. ही निळी जर्सी बीसीसीआयने रविवारी लाँच केली आहे. जर्सी टी-शर्ट फिकट निळ्या रंगाचा आहे. टी-शर्टमधील खांद्याचा भाग गडद निळा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकता हे पाहा..

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार?

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 सप्टेंबरला मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळल्या जाणार आहे.

  • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

    आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

    हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

  • भारतीय संघ : भारत-रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वरकुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

  • ऑस्ट्रेलिया : सीन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, नॅथन इलिस, अॅरोन फिंच (कर्णधार), कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT