IND vs AUS 2nd Test Tickets esakal
क्रीडा

IND vs AUS 2nd Test : बीसीसीआय जाम खुश! तब्बल 5 वर्षांनी दिल्लीत असं होणार...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 2nd Test Tickets : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची दुसरी कसोटी शुक्रवारपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे, ती खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. डिसेंबर 2017 नंतर दिल्लीत पहिली कसोटी खेळली जात आहे.

चार सामन्यांच्या मालिकेत भारताने नागपुरातील पहिली कसोटी तीन दिवसांत जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. 'तिकिटे विकली गेली आहेत आणि आम्हाला पूर्ण घर मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत बर्‍याच काळानंतर कसोटी सामना खेळला जात असल्याने खूप उत्सुकता आहे.' असे डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले.

अरुण जेटली स्टेडियमची आसनक्षमता 40,000 आहे. एकूण 24,000 तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती तर 8000 डीडीसीए सदस्यांमध्ये वितरीत करण्यात आली होती. ही गोष्ट सर्वसामान्य आहे. उर्वरित तिकिटे ही सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी वापरल्या जातील.

सामन्यासाठी सुरक्षा पुरविणाऱ्या कुटुंबांसाठी स्टँडचा एक भाग देखील राखीव आहे. मालिकेतील पहिल्या नागपूर कसोटीत देखील चांगली गर्दी जमली होती. भारताने ज्याप्रकारे खेळ केला त्यामुळे दिल्ली कसोटीत देखील गर्दी होईल. कसोटी क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT