india vs australia  sakal
क्रीडा

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला T20 सामना, पंत की कार्तिक कोणाला मिळेल संधी?

या मालिकेदरम्यान मधल्या फळीतील फलंदाजी व सहावा गोलंदाज याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाला लक्ष द्यावे लागणार

Kiran Mahanavar

India vs Australia : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान टी-20 विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाला सहा टी-20 लढती खेळावयाच्या आहेत. या सहा लढतींमध्येच भारतीय संघाला खेळाडूंची चाचपणी करावी लागणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मोहालीत उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेदरम्यान मधल्या फळीतील फलंदाजी व सहावा गोलंदाज याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली व सूर्यकुमार यादव हे भारताचे अव्वल चार क्रमांकाचे फलंदाज असतील. अर्थात कोहलीला अधूनमधून सलामीला पाठवण्याचा निर्णयही घेण्यात येऊ शकतो. हे स्वत: रोहितने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मात्र यष्टिरक्षक म्हणून कोणाला संघात खेळवायचे याबाबत संभ्रम कायम आहे. दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांच्यामध्ये चुरस आहे. रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे टी-20 विश्वकरंडकात खेळता येणार नाही. त्यामुळे मधल्या फळीत डावखुरा फलंदाज असायला हवा, यासाठी रिषभ पंतला अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

जडेजाला आशिया कप दरम्यान दुखापत झाली. त्यानंतर भारतीय संघात पाच गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले, पण आता हार्दिक पंड्या व अक्षर पटेल या दोन खेळाडूंना स्थान दिल्यास सहा गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. असे झाल्यास हार्दिक व अक्षरसह बुमरा, भुवनेश्वर, हर्षल व युझवेंद्र यांचा समावेश होईल.

आकडेवारीवर नजर...

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत 23 लढती झाल्या आहेत. भारताने यापैकी 13 लढतींमध्ये विजय मिळवला असून, ९ लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने यश संपादन केले आहे.

प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती

ऑस्ट्रेलियन संघ काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत या मालिकेत सहभागी होणार आहे. डेव्हिड वॉर्नर याला विश्रांती देण्यात आली असून मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनीस, मिचेल मार्श यांना दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत निवडण्यात आलेले नाही. कर्णधार ॲरोन फिंचने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. सुमार फॉर्ममधून जाणाऱ्या फिंचच्या फलंदाजीवर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

भारतीय संघ : भारत-रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वरकुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया : सीन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, नॅथन इलिस, अॅरोन फिंच (कर्णधार), कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन न्यायाधीशांमध्ये काय बिनसलं? Supreme Court च्या टीकेनंतर हायकोर्ट न्यायमूर्तींची खटल्यातून माघार, CJI सूर्यकांतांकडे विनंती

Mahashivratri : महाशिवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाण्याच्या भावात वाढ; साबुदाणा, भगर स्वस्त, आवक जास्त

पाकिस्तानात 'धुरंधर' सिनेमाची 'इतक्या' रुपयात होतेय पायरेटेड कॉपीची विक्री, सोशल मीडियावर Viral Video

ICU Bed Issue : ‘आयसीयू’ बेडसाठी धावाधाव; रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी

Latest Marathi News Live Update : जगभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार

SCROLL FOR NEXT