India Vs Australia Test Series Ravichandran Ashwin
India Vs Australia Test Series Ravichandran Ashwin esakal
क्रीडा

IND vs AUS Test Series : कांगारूंची आयडियाची कल्पना; अश्विनविरूद्ध अश्विनचाच डुप्लिकेट?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Australia Test Series : ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ भारतात बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. 1 फेब्रुवारीलाच ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला असून सध्या ते बंगळुरू येथे भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कॅम्प करत आहेत. ऑस्ट्रेलिया भारत सराव सामना खेळणार नाहीये.

भारताच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघासमोर कसोटी मालिकेसाठी भारतीय फिरकीपटूंचे मोठे आव्हान असणार आहे. भारताचा अव्वल गोलंदाज आर. अश्विन कसोटीत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे.

त्याचा भारतात मुकाबला करणे सोपं नाही. हेच हेरून कांगारूंनी एक रणनिती आखली आहे. कांगारूंनी अश्विनसारखाची अॅक्शन असलेला त्याचा डुप्लिकेट नेट बॉलर म्हणून पाचारण केला आहे.

बंगळुरू येथे सुरू असलेल्या सराव सत्रात कांगारूंना अश्विनची बॉलिंग खेळणे सुलभ व्हावे यासाठी महीश पिथिया याची मदत घेत आहेत. 21 वर्षाच्या महीशने बडोद्याकडून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

युवा महीशच्या फोनमध्ये त्याचा आयडॉल आर. अश्विनच्या फोटोंचा भरणा आहे. त्याला एक दिवस अश्विनसारखं व्हायचं आहे. मात्र सध्या तो त्याच्या आयडॉललाच टॅकल करण्यासाठी कांगारूंची मदत करतोय.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM: "मतमोजणी वेळी RO अधिकारी वॉशरूममध्ये जाऊन..." अनिल परब यांचे मोबाईल बदल प्रकरणी मोठे आरोप

Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

Snake In Car : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'

Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

Jayant Patil: या 8 गावांवर विशाल-विश्वजित यांचे विशेष लक्ष, जयंत पाटलांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे नियोजन?

SCROLL FOR NEXT