India vs Bangladesh 2nd ODI 2022
India vs Bangladesh 2nd ODI 2022 sakal
क्रीडा

IND vs BAN : करो या मरो! लढतीत 'या' दिग्गज खेळाडूंना मिळणार संधी

Kiran Mahanavar

India vs Bangladesh 2nd ODI 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासमोर आज बांगलादेशचे आव्हान असणार आहे. पहिल्या लढतीत पराभूत झालेल्या भारतीय संघांला एकदिवसीय (वन डे) मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी उद्याच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. बांगलादेशकडे मायदेशात सलग दुसऱ्यांदा भारताला पराभूत करण्याची नामी संधी असणार आहे.

भारत-बांगलादेश यांच्यामधील पहिली लढत मिरपूर येथे रंगली. भारताला या लढतीत फक्त १८६ धावाच करता आल्या. येथील खेळपट्टी गोलंदाजांना पोषक होती, असे या मात्र वेळी म्हणता येणार नाही. शाकीब अल हसन व इबादोत हौसेन यांनी अनुक्रमे पाच व चार मोहरे टिपत भारतीय संघाला बांधून ठेवले. रोहित शर्मा (२७ धावा), शिखर धवन (७ धावा), विराट कोहली (९ धावा), श्रेयस अय्यर (२४ धावा) या स्टार फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. के. एल. राहुलने ७३ धावांची खेळी केली, पण सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा दबाव त्याच्यावर असेल.

इशान, रजत, राहुल त्रिपाठीला संधी?

पहिल्या लढतीत पराभूत झाल्यामुळे आजच्या लढतीत भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इशान किशन, रजत पाटीदार व राहुल त्रिपाठी या राखीव खेळाडूंना उद्या संधी देण्यात येते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. अक्षर पटेलच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद यांच्याकडून आणखी चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT