India vs Bangladesh 2022 sakal
क्रीडा

IND vs BAN LIVE Streaming : पुन्हा चॅनल बदलला! भारत-बांगलादेश सामने 'या' ॲपवर दिसणार...

भारत-बांगलादेश सामने पुन्हा हॉटस्टार वर नाही दिसणार!

Kiran Mahanavar

IND vs BAN LIVE Streaming Mobile and TV: भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया गुरुवारी बांगलादेशला पोहोचणार आहे. बांगलादेशमध्ये पहिले तीन वनडे आणि त्यानंतर दोन कसोटी सामने होणार आहेत. भारतीय संघाच्या या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. दरम्यान मालिका सुरू होण्यापूर्वी, तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही या मालिकेचे सामने कोणत्या टीव्ही चॅनेलवर थेट पाहू शकता आणि सामने कुठे मोबाइलवर प्रसारित केले जाणार आहेत.

सोनी नेटवर्क आणि दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील सर्व सामने तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहिले असतील. पण आता पुन्हा चॅनल बदलणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील लाइव्ह मालिकेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर जावे लागेल. तिथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल. तसेच, जर तुम्हाला मोबाईल अॅपवर सामने पहायचे असतील, तर तुम्हाला सोनी लिव्हवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. सोनी व्यतिरिक्त, तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर या टूरच्या प्रत्येक सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता. (Ind vs Ban ODI and TEST Match Watch Live on Sony Sports And DD Sports)

एकदिवसीय आणि कसोटी मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक

  • पहिला सामना : 4 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता - शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाक

  • दुसरा सामना : 7 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता - शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका

  • तिसरा सामना : 10 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव

  • पहिली कसोटी सामना : 14 – 18 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव

  • दुसरी कसोटी सामना : 22 – 26 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT