ENG v IND T20 ESAKAL
क्रीडा

IND Vs ENG: आज-उद्याही टी-20 मेजवानी; दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय निश्चित!

इंग्लंड दौरा; पहिला सामना जिंकणाऱ्या भारताचे वर्चस्व अपेक्षित

Kiran Mahanavar

India vs England 2nd T20 Match : कसोटी सामन्यातील पराभवाच्या दुःखावर पहिल्या टी-20 सामन्याचा उतारा भारतीय संघाने दिला. आता उद्या आणि रविवारी सलग दोन दिवसांतही पुढच्या दोन सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. धडाकेबाज खेळ करून विजय मिळवणारा भारतीय संघ हेच सूत्र पुढच्या दोन सामन्यातही कायम राखून मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्या पहिल्या सामन्यातील यशाचा प्रमुख शिलेदार ठरला. दणकेबाज अर्धशतक आणि चार विकेट अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली.

आयर्लंडमध्ये दोन टी-20 सामने जिंकलेल्या संघातील खेळाडूंचे नेतृत्व रोहित शर्माने पहिल्या सामन्यात केले. दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या सामन्याकरिता विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा संघात परतत आहेत. सोबतीला गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी करणारे युझवेंद्र चहल, दीपक हुडा आणि हार्दिक पंड्या सारखे खेळाडू असतील. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उभारलेल्या मोठ्या धावफलकाला गोलंदाजांनी मस्त रोखून धरले. इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला सूर गवसला नाही आणि भलामोठा विजय भारतीय संघाच्या हाती लागला.

सध्या आपल्या सकारात्मक विचारांनी भारावून सोडणारा ब्रँडन मॅक्कुलम पुढील दोन सामन्यात इंग्लंड संघाला विजयाकरता काय कानमंत्र देतो हे बघावे लागेल. पहिल्या सामन्यात गेलेली लय परत आणायला जोस बटलर, जेसन रॉय आणि लियाम लिव्हिंगस्टोन भारतीय गोलंदाजांवर आक्रमक हल्ला करतील, यात शंका नाही. एजबास्टन क्रिकेट मैदानावरची खेळपट्टी फटकेबाजीकरिता किती चांगली आहे याचा प्रत्यय कसोटी सामन्यात आला होता.

क्षेत्ररक्षणाचा सराव

सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय संघाने साउदम्पटनहून बर्मिंगहॅमचा प्रवास केला. संघातील बऱ्याच खेळाडूंनी दुपारी एजबास्टन क्रिकेट मैदानावर प्रामुख्याने झेल पकडण्याचा सराव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

India vs Pakistan पुन्हा भिडणार, १६ तारखेला हायव्होल्टेज सामना; वैभव सूर्यवंशी शेजाऱ्यांची वाट लावणार, जितेश शर्माकडे कर्णधारपद

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

SCROLL FOR NEXT