IND vs ENG Twitter
क्रीडा

VIDEO : रोहित आउट झाला अन् विराट आधी इंग्लिश मॅन बॅटिंगला आला

इंग्लिश चाहता टीम इंडियाकडून बॅटिंगसाठी उतरल्याच्या किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

ENG vs IND 3rd test: लीड्स कसोटी सामन्यात मोठ्या अंतराच्या धावसंख्येनं पिछाडीवर असलेली टीम इंडिया रंगात दिसतेय. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरला आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याला पायचित बाद दिल्याच्या निर्णयावरुन सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इंग्लिश चाहता टीम इंडियाकडून बॅटिंगसाठी उतरल्याच्या किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

लीड्सच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने नावाला साजेसा खेळ केला. त्याने 156 चेंडूत 59 धावांची उपयुक्त खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक अप्रतिम षटकार लगावला. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला. पण यादरम्यान आणखी एक अवांतर खेळाडू पॅड बांधून मैदानात क्रिजमध्ये घुसल्याचे पाहायला मिळाले.

रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रिजमध्ये पोहचण्या आधीच इंग्लंडचा रहिवाशी असलेला आणि भारत इंग्लंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाचे समर्थन करताना दिसणारा जारवो (An English fan named Jarvo) याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पॅड बांधून बॅटिंगसाठी आलेल्या या इंग्लिश मॅनला बाहेर काढण्यासाठी पंचांना सुरक्षा रक्षकांचा आधार घ्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॉर्ड्सच्या मैदानात देखील हाच चाहता बॉलिंग करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. ब्रेकनंतर भारतीय संघ जेव्हा फिल्डिंगसाठी मैदानात आला त्यावेळी तोही मैदानात आला. अगोदर तो भारतीय खेळाडूंपैकी कोणीतरी असावा असेच वाटले होते. पण नंतर कळले की तो प्रेक्षकातून मैदानात घुसला आहे. यावेळी देखील त्याला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT