virat kohli rishabh pant who is the captain absence corona positive rohit sharma
virat kohli rishabh pant who is the captain absence corona positive rohit sharma  
क्रीडा

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कोरोना पॉझिटिव्ह रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण?

Kiran Mahanavar

इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. सराव सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा कोविड 19 च्या रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. कर्णधार रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी रोहित फिट झाला नाही तर टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो. (virat kohli rishabh pant who is the captain absence corona positive rohit sharma)

पहिल्यांदाच परदेशात कसोटीचे कर्णधारपद भूषवणारा रोहित या कसोटीतून बाहेर पडला, तर संघाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सलामीवीर केएल राहुलही दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर आहे, अन्यथा त्याच्याकडे कर्णधारपद दिले असते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात राहुल जखमी झाल्यानंतर पंतने भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी केएल राहुलला उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. पण कंबरेच्या दुखापतीमुळे तो केवळ या कसोटीतूनच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतूनही बाहेर पडला आहे. अशा स्थितीत कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार?.

बर्मिंगहॅम कसोटी भारतासाठी किती महत्त्वाची आहे, हे पाहता कोहलीला कर्णधारपद सोपवता येईल का? कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडवर २-१ अशी आघाडी घेतली. अशा परिस्थितीत विराट कोहली हा कर्णधार होण्याचा एकमेव प्रबळ दावेदार आहे. कोहलीने अपूर्ण राहून त्याच्या नेतृत्वाखाली ही मालिका पूर्ण करावी अशी संघाची इच्छा आहे.

कोहलीच्या नावाचा विचार न झाल्यास पाचव्या कसोटीत ऋषभ पंत कर्णधार होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20I मालिकेत ऋषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. या मालिकेतही रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. मात्र या सलामीवीराच्या दुखापतीनंतर बीसीसीआयने पंतकडे कमान सोपवली. पंतच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT