India Vs England Mohammed Shami
India Vs England Mohammed Shami  esakal
क्रीडा

IND vs ENG Mohammed Shami : ज्यावेळी दोन्ही एन्डकडून दबाव असतो... टीम इंडिया शमीला जास्तच मिस करतेय?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England Mohammed Shami : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र यामुळे पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहवर अतिरिक्त ताण आला होता. पहिल्या कसोटीत बुमराहने दमदार गोलंदाजी केली.

बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीतून सावरला आहे. त्याला 2022 मध्ये ही दुखापत झाली होती. त्याने न्यूझीलंडमध्ये जाऊन शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तो जवळपास 11 महिने मैदानापासून दूर होता. त्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयर्लंडविरूद्धच्या टी 20 मालिकेतून पुनरागमन केलं.

वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता बुमराह कसोटी क्रिकेटचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत मात्र त्याच्यावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे पहिलाय दोन कसोटीत खेळत नाहीये.

याबाबत इरफान पठाणने आपले मत व्यक्त केलं. 'नक्कीच मोहम्मद शमीची उणीव भारताला भासत आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की बुमराहला पुन्हा दुखापत होण्याची शक्यता आहे. त्याची अॅक्शन ही व्यवस्थित आहे.'

पुनरागमनानंतर बुमराहच्या रन अपमध्ये एका स्टेपची वाढ झाली आहे. तो आता चेंडू टाकण्यासाठी अजून लांबून पळत येतोय. त्यामुळे त्याच्या कंबरेवर कमी ताण पडतोय. इरफान पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी दोन्ही एन्डकडून दबाव असतो. मग शमी विकेट्स घेत असो किंवा बुमराह विकेट्स घेत असो. त्यांची भागीदारी फक्त एकमेकांवरचा दबाव कमी करत नाही तर संघाला देखील फायदा देत असते.'

इरफान बुमराहच्या समर्पित वृत्तीचा चाहता झाला आहे. तो म्हणाला की, 'मी जसप्रीत बुमराहचे कौतुक करतो. त्याने कसोटी क्रिकेट खेळण्याची दाखवलेली तीव्र इच्छा वाखाण्याजोगी आहे. तो दुखापतीनंतरही कसोटी क्रिकेटला प्राथमिकता देत आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT